आजचे राशिभविष्य आणि पंचांग - 7 नोव्हेंबर

Bhavishya
Bhavishya

पंचांग -
शनिवार : निज आश्विन कृष्ण ७, चंद्रनक्षत्र पुनर्वसू, चंद्रराशी कर्क, सूर्योदय ६.३८, सूर्यास्त ५.५७, चंद्रोदय रात्री ११.२९, चंद्रास्त दुपारी १२.१०, भारतीय सौर कार्तिक १६ शके १९४२.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

दिनविशेष -
१८५८ - ‘लाल-बाल-पाल’ या त्रयीतील गाजलेले स्वातंत्र्यसेनानी बिपिनचंद्र पाल यांचा जन्म.
१८८४ - विख्यात कृषितज्ज्ञ व भारताबाहेर राहून भारतीय स्वातंत्र्यासाठी झटणारे प्रसिद्ध क्रांतिकारक पांडुरंग सदाशिव खानखोजे यांचा जन्म.
१८८८ - भारतात आधुनिक विज्ञानाचा पाया घालण्याची महत्त्वाची कामगिरी करणारे नोबेल पारितोषिक विजेते भारतीय पदार्थशास्त्रज्ञ डॉ. चंद्रशेखर व्यंकट रामन यांचा जन्म. १९५४ मध्ये भारत सरकारने त्यांना ‘भारतरत्न’ हा सर्वोच्च पुरस्कार बहाल केला. १९५७ मध्ये त्यांना आंतरराष्ट्रीय लेनिन ॲवॉर्ड पुरस्काराने गौरविले.
१९०५ - आधुनिक मराठी कवितेचे प्रवर्तक कवी केशवसुत यांचे निधन. त्यांचे खरे नाव कृष्णाजी केशव दामले. ‘तुतारी’, ‘नवा शिपाई’, ‘गोफण केली छान’ इ. कविता प्रसिद्ध आहेत.१९९६ - ज्येष्ठ चित्रकार रवी परांजपे यांना नवी दिल्ली येथील दयावती मोदी फाउंडेशनचा ‘दयावती मोदी पुरस्कार’ जाहीर. कला, शिक्षण व सांस्कृतिक क्षेत्रात भरीव कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना हा पुरस्कार देण्यात येतो.
१९९८ - प्रतिभावंत गायक, संगीतकार व गुरू पं. जितेंद्र अभिषेकी यांचे निधन. त्यांनी संगीत दिलेल्या ‘मत्स्यगंधा’ या नाटकातील ‘देवाघरचे ज्ञात कुणाला..’,‘नको विसरु संकेत मीलनाचा...’,‘गुंतता हृदय हे...’ आदी गीतांनी मोठी लोकप्रियता मिळविली.
२००० - ज्येष्ठ गांधीवादी नेते, माजी केंद्रीय मंत्री, महाराष्ट्राचे माजी राज्यपाल आणि हरितक्रांतीचे अर्ध्वयू सी. सुब्रह्मण्यम यांचे निधन.
२००४ - संपूर्ण स्वदेशी बनावटीच्या धनुष या मध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्राची चंडीपूरपासून तीस किलोमीटर अंतरावर समुद्रात ‘आयएनएस सुभद्रा’वरून यशस्वी चाचणी घेण्यात आली. धनुष क्षेपणास्त्राचा पल्ला २५० किलोमीटरचा असून, त्याची लांबी ८.५६ मीटर आहे.

दिनमान -
मेष :
मानसिक प्रसन्नता लाभेल. प्रवास सुखकर होतील.तुमचा इतरांवर प्रभाव पडेल.
वृषभ : काहींना भाग्यकारक अनुभव येतील. जिद्द व चिकाटी वाढेल. 
मिथुन : तुमची मते इतरांना पटवून द्याल. मनोबल व उत्साह वाढेल.
कर्क : दैनंदिन कामे मार्गी लागतील. अनेकांशी सुसंवाद साधाल.
सिंह : मनोबल कमी राहील. महत्त्वाची कामे शक्‍यतो पुढे ढकलावीत.
कन्या : महत्त्वाचे निर्णय घेवू शकाल. अपेक्षित पत्र व्यवहार होतील.
तुळ : मनोबल व आत्मविश्‍वास उत्तम राहील. व्यक्‍तिमत्त्वाचा प्रभाव पडेल.
वृश्‍चिक : रखडलेली कामे मार्गी लावू शकाल. नवीन हितसंबंध निर्माण करू शकाल.
धनु : मनोबल कमी राहील. महत्त्वाच्या कामात अडचणी येण्याची शक्‍यता आहे.
मकर : तुमचे अंदाज अचूक ठरतील. दैनंदिन कामे यशस्वी होतील.
कुंभ : खर्चाचे प्रमाण वाढेल. हितशत्रुंचा त्रास संभवतो.नवीन परिचय होतील.
मीन : संततीसौख्य लाभेल. महत्त्वाचे निर्णय योग्य ठरतील.नोकरीत उत्तम स्थिती राहील.

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com