esakal | आजचे राशिभविष्य आणि पंचांग - ८ फेब्रुवारी २०२१
sakal

बोलून बातमी शोधा

Daily Horoscope

सोमवार : पौष कृष्ण १२, चंद्रनक्षत्र मूळ, चंद्रराशी धनू, सूर्योदय ७.०६ सूर्यास्त ६.३०, चंद्रोदय पहाटे ५, चंद्रास्त दुपारी ३.१६, भागवत एदशी, भारतीय सौर माघ १८ शके १९४२.

आजचे राशिभविष्य आणि पंचांग - ८ फेब्रुवारी २०२१

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

सोमवार : पौष कृष्ण १२, चंद्रनक्षत्र मूळ, चंद्रराशी धनू, सूर्योदय ७.०६ सूर्यास्त ६.३०, चंद्रोदय पहाटे ५, चंद्रास्त दुपारी ३.१६, भागवत एदशी, भारतीय सौर माघ १८ शके १९४२. 

दिनविशेष
१८९७ : भारताचे तिसरे राष्ट्रपती व नामवंत शिक्षणतज्ज्ञ डॉ. झाकिर हुसेन यांचा जन्म. महात्मा गांधींच्या शिक्षणविषयक कल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी त्यांनी अलिगड येथे जामिया मिलिया ही संस्था स्थापन केली. १९६३ मध्ये त्यांना ‘भारतरत्न’ पुरस्कार देण्यात आला.
१८९९ : रॅंडचा खून करणाऱ्या चापेकर बंधूंची नावे इंग्रज सरकारला सांगणाऱ्या द्रविड बंधूंचा वासुदेव चापेकर आणि महादेव रानडे यांनी गोळ्या झाडून खून केला.
१९९५ : भारताचे माजी नौदलप्रमुख व्हाईस ॲडमिरल भास्करराव सोमण यांचे निधन. १९६५ च्या युद्धाच्या काळात ते नौदलप्रमुख होते. सरसेनापती पदापर्यंत जाणारे ते पहिले मराठी अधिकारी होते. 
१९९९ : समाजाने दूर अंधकारात लोटलेल्या कुष्ठरोग्यांच्या जीवनात आनंद फुलवणाऱ्या डुडुळगाव येथील ‘आनंदग्राम’च्या संस्थापिका, ज्येष्ठ समाजसेविका डॉ. इंदुताई पटवर्धन यांचे निधन.

दिनमान
मेष : काहींना गुरूकृपा लाभेल. आरोग्य चांगले राहील. जिद्द व चिकाटी वाढेल.
वृषभ : कामाचा ताण व दगदग जाणवेल. महत्त्वाची वार्ता समजण्याची शक्‍यता. 
मिथुन : कामे मार्गी लागतील. जोडीदाराची अपेक्षित साथ लाभेल.
कर्क : विरोधकांवर मात कराल. हाती घेतलेल्या कामात यश लाभेल.
सिंह : संततीचे प्रश्‍न निर्माण होतील. तुमचे अंदाज व निर्णय अचूक ठरतील.
कन्या : प्रॉपर्टी व गुंतवणुकीच्या संदर्भात काही नवीन प्रस्ताव समोर येतील. 
तुळ : जिद्द व चिकाटी वाढेल. काहींची आध्यात्मिक क्षेत्रात प्रगती होईल.
वृश्‍चिक  : ट्रान्स्पोर्ट क्षेत्रातील व्यक्‍तींसाठी आजचा दिवस उत्तम आहे. 
धनु : विरोधकांवर मात कराल. वैवाहिक सौख्य लाभेल.
मकर : दानधर्मासाठी खर्च कराल. कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल.
कुंभ : महत्त्वाचे पत्र व्यवहार होतील. मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल.
मीन : मान व प्रतिष्ठेचे योग येतील. नोकरीत समाधानकारक स्थिती राहील.
प्रा. रमणलाल शहा

loading image