
पंचांग -
शुक्रवार : मार्गशीर्ष कृष्ण १०, चंद्रनक्षत्र स्वाती, चंद्रराशी तूळ/वृश्चिक, चंद्रोदय पहाटे ३.०१, चंद्रास्त दुपारी १.५४, सूर्योदय ७.१०, सूर्यास्त ६.१२, भारतीय सौर पौष १८ शके १९४२.
पंचांग -
शुक्रवार : मार्गशीर्ष कृष्ण १०, चंद्रनक्षत्र स्वाती, चंद्रराशी तूळ/वृश्चिक, चंद्रोदय पहाटे ३.०१, चंद्रास्त दुपारी १.५४, सूर्योदय ७.१०, सूर्यास्त ६.१२, भारतीय सौर पौष १८ शके १९४२.
- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
दिनविशेष -
१९४२ - विश्वनिर्मितीचं गूढ उलगडण्याचा प्रयत्न करणारे प्रसिद्ध शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचा जन्म. सापेक्षतावाद व पूंजयांत्रिकी या सिद्धांतांचा मेळ घालण्यात यश मिळालं, तर विश्वाची निर्मिती कशी झाली या मूलभूत प्रश्नाचं उत्तर शोधणं सोपं जाईल असा क्रांतिकारक विचार मांडून हॉकिंग यांनी विज्ञान संशोधनाला विसाव्या शतकात दिशा व गती दिली.
१९६६ - चित्रपट दिग्दर्शक व निर्माते बिमल रॉय यांचे निधन.
१९६७ - जागतिक ख्यातीचे संस्कृत पंडित, संशोधक व थोर प्राच्यविद्या पंडित श्रीपाद कृष्ण बेलवलकर यांचे पुणे येथे निधन.
१९७३ - ‘सकाळ’ वृत्तपत्राचे संस्थापक संपादक डॉ. ना. भि. तथा नानासाहेब परुळेकर यांचे पुण्यात निधन.
१९८४ - ब्राह्मो समाजातील एक थोर पुरुष, उत्कृष्ट वक्ते आणि विख्यात लोकसेवक केशवचंद्र सेन यांचे निधन.
१९९१ - कर्वे समाज संस्थेचे संस्थापक भास्कर धोंडो कर्वे यांचे निधन.
२००० - स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर यांची १९९९ साठीच्या आंध्र प्रदेश सरकारच्या एन. टी. रामाराव राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारासाठी निवड.
दिनमान -
मेष : तुम्ही आपली मते इतरांना पटवून देवू शकाल. वैवाहिक सौख्य लाभेल.
वृषभ : प्रवासात वस्तू गहाळ होणार नाहीत याची दक्षता घ्यावी. खर्चाचे प्रमाण वाढेल.
मिथुन : अपूर्व मनोबलाच्या जोरावर कार्यरत रहाल. आरोग्य चांगले राहील.
कर्क : व्यवसायातील महत्त्वाची कामे पुढे ढकलावीत. मनोबल वाढेल.
सिंह : काहींना प्रवासाचे योग येतील. उत्साह व उमेद वाढेल. खर्चाचे प्रमाण वाढेल.
कन्या : थोरामोठ्यांचे सहकार्य लाभेल. व्यक्तिमत्त्वाचा इतरांवर प्रभाव राहील.
तुळ : नातेवाईकांच्या गाठीभेटी होतील.जोडीदाराचा सल्ला लाभदायक ठरेल.
वृश्चिक : भागीदारी व्यवसायातील महत्त्वाचे निर्णय पुढे ढकलावेत.
धनु : आर्थिक लाभाचे प्रमाण वाढेल. मुलामुलींच्या प्रगतीकडे लक्ष देवू शकाल.
मकर : सार्वजनिक व सामाजिक क्षेत्रात सहभागी होण्याची संधी लाभेल.
कुंभ : अपेक्षित असणाऱ्या क्षेत्रात सुसंधी लाभेल. आरोग्य चांगले राहील.
मीन : काहींना अचानक धनलाभ संभवतो. नोकरीत समाधानकारक स्थिती.
Edited By - Prashant Patil