esakal | आजचे राशिभविष्य आणि पंचांग - 8 मार्च 2021

बोलून बातमी शोधा

Bhavishya_73.jpg}

जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस 

आजचे राशिभविष्य आणि पंचांग - 8 मार्च 2021
sakal_logo
By
टीम ई-सकाळ

आजचे दिनमान
मेष : अपेक्षित सुसंधी लाभेल. तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी व प्रसिद्धी लाभेल.
वृषभ : वाहने सावकाश चालवावीत. एखादी चिंता लागून राहील.
मिथुन : जोडीदाराचा सल्ला लाभदायक ठरेल. भागीदारी व्यवसायातील महत्त्वाचे निर्णय मार्गी लागतील.
कर्क : काहींचा मनोरंजनकडे कल राहील. आरोग्याच्या तक्रारी जाणवतील.
सिंह : आर्थिक लाभाचे प्रमाण समाधानकारक राहील. नवीन परिचय होतील.
कन्या : तुमच्या व्यक्‍तिमत्त्वाचा इतरांवर प्रभाव पडेल. काहींना सुसंधी व प्रसिद्धी लाभेल.
तुळ : नातेवाईकांच्या गाठीभेटी होतील. आरोग्य उत्तम राहील.
वृश्‍चिक : दैनंदिन कामे मार्गी लागतील. कौटुंबिक जीवनात सौख्य व समाधान लाभेल.
धनु : आपली मते इतरांना पटवून देण्यात यशस्वी व्हाल. उत्साह व उमेद वाढेल.
मकर : खर्चाचे प्रमाण वाढेल. मानसिक अस्वस्थता जाणवेल.
कुंभ : मुलामुलींच्या प्रगतीकडे लक्ष देणे गरजेचे भासेल. प्रॉपर्टीच्या कामात यश लाभेल.
मीन : उत्साह व उमेद वाढविणारी एखादी घटना घडेल. दैनंदिन कामे मार्गी लागतील.

दिनविशेष - 8 मार्च
1833 - प्रसिद्ध समाजसुधारक, कायदेपंडित रावसाहेब विश्वनाथ नारायण मंडलिक यांचा जन्म.
1864 - मराठीतील नामवंत कादंबरीकार व पुण्याचे नगराध्यक्ष हरी नारायण आपटे यांचा जन्म.
1917 - पेट्रोग्राड या शहरात रशियन क्रांतीला सुरवात. पुढे कम्युनिस्टांच्या क्रांतीनंतर या शहराला "लेनिनग्राड' असे नाव दिले गेले.
1930 - प्रसिद्ध कवी, लेखक व नाटककार चिं. त्र्यं. खानोलकर यांचा जन्म. "आरती प्रभू' या नावाने ते कविता लिहीत. जोगवा, दिवेलागण, नक्षत्रांचे देणे हे त्यांचे काव्यसंग्रह असून, रात्र काळी घागर काळी, अजगर, कोंडुरा, त्रिशंकू या त्यांच्या कादंबऱ्या प्रसिद्ध आहेत.
1957 - मुंबई राज्याचे पहिले मुख्यमंत्री, भारताचे ब्रिटनमधील उच्चायुक्त बाळ गंगाधर खेर यांचे निधन.
1993 - "दमानिया एअरवेज' या खासगी विमान वाहतूक कंपनीने आपल्या पहिल्या विमानाला "स्पिरीट ऑफ जे. आर. डी.' असे नाव देण्याचे ठरविले.
1995 - शेतीच्या भवितव्याचा विचार करणारे भारतातील पहिले आंतरराष्ट्रीय कृषी प्रदर्शनाचे दिल्ली येथील प्रगती मैदानावर उद्‌घाटन.
1997 - ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक, आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री, उत्तर प्रदेशचे माजी राज्यपाल व्ही. गोपालरेड्डी यांचे निधन.
2002 - कर्नाटक संगीत क्षेत्रातील ज्येष्ठ गायक आणि व्हायोलिनवादक डॉ. एम. बालमुरलीकृष्ण यांना एस. व्ही. नारायणस्वामी राव स्मृती राष्ट्रीय पुरस्कार जाहीर. हा बहुमान मिळविणारे ते दुसरे गायक आहेत.
2004 - "लिक्विड क्रिस्टल'संबंधीच्या संशोधनाचे प्रणेते प्रा. एस.चंद्रशेखर यांचे निधन. बंगळूरमध्ये "सेंटर फॉर लिक्विड क्रिस्टल रीसर्च' या संस्थेच्या उभारणीत त्यांचा महत्त्वाचा वाटा होता. केंद्र सरकारने पद्मभूषण किताबाने त्यांचा गौरव केला होता. इंग्लंडचे रॉयल मेडल, नील्स बोर सुवर्णपदक, फ्रेंच सरकारचा पुरस्कार आणि अनेक आंतरराष्ट्रीय पुरस्कार त्यांना मिळाले होते.