esakal | आजचे राशीभविष्य : दिनांक : 9 एप्रिल 2021
sakal

बोलून बातमी शोधा

rashibhavishy

वाचा काय आहे आपल्या राशीभविष्यात...

आजचे राशीभविष्य : दिनांक : 9 एप्रिल 2021

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

दिनांक : 9 एप्रिल 2021 : वार : शुक्रवार
आजचे दिनमान
मेष : आर्थिक सुयश लाभेल. महत्त्वाचे पत्र व्यवहार होतील.
वृषभ : मानसिक प्रसन्नता लाभेल. सामाजिक क्षेत्रात सहभागी व्हाल.
मिथुन : तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी व प्रसिद्धी लाभेल. एखादी भाग्यकारक घटना घडेल.
कर्क : प्रवासामध्ये काळजी घ्यावी. तुमच्यावर एखादी जबाबदारी येवून पडण्याची शक्यता आहे.
सिंह : आरोग्य उत्तम राहील. आपली मते इतरांना पटवून देण्यात यशस्वी व्हाल.
कन्या : विरोधकांवर मात कराल. कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल.
तुळ : संततीचे प्रश्‍न मार्गी लागतील. शेअर्समध्ये गुंतवणूक करताना बाजारपेठेचा चौफेर अभ्यास करून गुंतवणूक करावी.
वृश्‍चिक : मनोबल व आत्मविश्‍वास वाढविणारी एखादी घटना घडेल. राहत्या जागेचे व व्यवसायाच्या जागेचे प्रश्‍न मार्गी लागतील.
धनु : तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी लाभेल. नातेवाईकांच्या गाठीभेटी होतील.
मकर : कौटुंबिक सौख्य लाभेल. उत्साह, उमेद वाढेल.
कुंभ : एखादी महत्त्वाची वार्ता समजण्याची शक्यता आहे. आरोग्याच्या तक्रारी कमी होतील.
मीन : महत्त्वाचे निर्णय शक्यतो पुढे ढकलावेत. हितशत्रुंवर मात कराल.

loading image