- केतन पुरी, ketan.author@gmail.com
जोर्वे आणि इनामगावबद्दल आपण मागील लेखात थोडक्यात माहिती घेतली. अशीच काहीशी वेगळी पार्श्वभूमी असणारे आणखी एक गाव अहिल्यानगर (अहमदनगर) जिल्ह्यात आहे. त्या गावाचाही शोध जोर्वे संस्कृतीप्रमाणे अपघाताने लागला. चाळीसेक वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. गुराख्यांची काही पोरं सरपण गोळा करत असताना एका झाडाखाली जाऊन पोचली. त्यांना तिथे जमिनीवर आलेली काही जाडसर वस्तू नजरेस पडली.