Dalit Files Novel by Sharankumar Limbale : ‘दलित फाइल्स’मध्ये जातीय अन्यायाच्या जखमा आणि शिक्षणासाठीचा संघर्ष कसा मांडला?

Dalit Files Novel and Caste Discrimination : शरणकुमार लिंबाळे यांच्या ‘दलित फाइल्स’ या कादंबरीत जातीय अन्याय, शिक्षणासाठीचा संघर्ष आणि दलित चळवळीतील कार्यकर्त्यांची मानसिक घुसमट मांडली आहे. निंग्या आणि बनसोडे सरांच्या अनुभवांतून सामाजिक वास्तवाचे भेदक चित्र समोर येते.
Dalit Files Novel by Sharankumar Limbale

Dalit Files Novel by Sharankumar Limbale

esakal

Updated on: 

प्रा. डॉ. विजयकुमार खंदारे - saptarang@esakal.com

दलित फाइल्स’ ही शरणकुमार लिंबाळे यांची नवी कादंबरी प्रकाशित झाली आहे. ‘काश्मिर फाइल्स’, ‘केरळ फाईल्स’, ‘बंगाल फाइल्स’, ‘गुजरात फाइल्स’ अशी शीर्षके आपल्या परिचयाची आहेत. ‘दलित फाइल्स’ शीर्षक या शृंखलेतलेच आहे. यामध्ये अन्यायकारक घटना न्यायाची प्रतीक्षा करत धूळ खात पडलेल्या दिसतात.

मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतराच्या वेळी पोचीराम कांबळे यांचा झालेला खून असो, भंडारा जिल्ह्यातील खैरलांजी हत्याकांड असो, दलित पँथर व शिवसेना यांच्यात झालेली परळी येथील जातीय दंगल असो किंवा राजस्थानमधील सवर्ण शिक्षकाने पिण्याचे पाणी विटाळले म्हणून दलित विद्यार्थ्याचा केलेला खून असो अशा घटना निवडून ‘दलित फाइल्स’ ही कादंबरी लिहिली आहे. ‘दलित पँथर’ या चळवळीतल्या एका कार्यकर्त्याच्या मानसिकतेची आणि त्याच्या जीवनातील फरफटीचे चित्रण करणारी ही कादंबरी आहे.

Loading content, please wait...