

New Marathi book
esakal
माणसाच्या मनाचा थांग लागणे सर्वांत कठीण असते असे म्हणतात. प्रत्येक माणूस वेगळा असतो, त्यामुळे एका विशिष्ट परिस्थितीत कोण कसे वागेल, हे सांगणे अवघड असते. अनेकदा आपण एखाद्या माणसाबाबत काही आडाखे बांधलेले असतात किंवा त्याच्या वर्तनावरून त्याच्या स्वभावाविषयी तर्क केलेले असतात, पण त्याचे एक वेगळेच रूप काही प्रसंगांतून समोर येते. आपल्या आयुष्यात येणाऱ्या अशा विविधरंगी माणसांमुळे जगणे अनुभवसंपन्न, समृद्ध होते. माणसाच्या अशा बदलत्या रूपांचा वेध घेणाऱ्या स्वाती चांदोरकर यांच्या कथांचा ‘डे-केअर’ हा कथासंग्रह नुकताच प्रकाशित झाला आहे. यातील कथा आपल्या आजूबाजूला वावरणाऱ्या किंवा आपल्या घरातील माणसांच्याच आहेत असे वाटते.