Delhi Diary Book Review : दिल्लीचे सर्वांगीण दर्शन घडवणारी डायरी

Supriya Devasthali : सुप्रिया देवस्थळी यांच्या ‘दिल्ली डायरी’मध्ये राजधानी दिल्लीचे सामाजिक, सांस्कृतिक, प्रशासकीय आणि खाद्यविश्व संवेदनशील निरीक्षणातून उलगडत असून, स्थलांतरिताच्या अनुभवांना साहित्यिक स्पर्श लाभतो.
Delhi Diary Book Review

Delhi Diary Book Review

esakal

Updated on

अमित भोळे - saptarang@esakal.com

दिल्ली डायरी’ हे पुस्तक हातात घेतल्यावर कुतूहल निर्माण होते, ते डायरी या शब्दामुळे. लेखिका सुप्रिया देवस्थळी यांनी त्यांच्या ह्या पहिल्या पुस्तकातून दिल्लीचे दर्शन घडवले आहे. स्थलांतरित मराठी व्यक्तीने दिल्लीसारख्या विशाल, गुंतागुंतीच्या आणि अनेक गैरसमजुतींनी ग्रासलेल्या शहराला ज्या संवेदनशीलतेने, निरीक्षण शक्तीने आणि भाषासौंदर्याने रेखाटले आहे, ते विलक्षण आहे.

हे पुस्तक म्हणजे दिल्लीचे केवळ वर्णन नाही; तर दिल्लीला समजून घेण्याचा प्रयत्न आहे. हा प्रवास वाचकाला इतका जवळचा वाटतो की, पुस्तक संपल्यानंतरही दिल्लीची भव्यता, गोंगाट, खाद्यसंस्कृती आणि तेथील माणसे मनात रेंगाळत राहतात. मुंबईतल्या सुरक्षित, परिचित वातावरणातून दिल्लीच्या अनिश्चिततेत पाऊल टाकताना लेखिका ज्या संघर्षातून जाते तो संघर्ष आपण अनुभवतो. हा संघर्ष केवळ प्रशासकीय नाही, तर तो भावनिक, सामाजिक आणि कौटुंबिकदेखील आहे.

शाळेच्या प्रवेशद्वारापासून सरकारी घराच्या चाव्यांपर्यंतचा प्रवास हा जणू एखाद्या दृश्यस्पर्धेचा रंगमंच आहे. भारत सरकारची अक्षरे असलेल्या गाडीला मिळणारी वेगळी वागणूक, ओळखपत्राच्या रंगावरून ठरत जाणारी वरिष्ठतता, पालकांमधील निःशब्द स्पर्धा... हे सर्व लेखिका इतक्या सूक्ष्मपणे टिपतात की, वाचकाला आपणच तिथे उभे असल्याचा भास होतो. या निरीक्षणाला हलकीशी उपरोधाची धार आहे, पण ती कधीही कटू होत नाही. उलट, ती दिल्लीच्या सामाजिक वास्तवाचे अचूक चित्रण करते.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com