Premium|Dhurandhar Movie Review : पुण्यातील व्हिज्युअल इफेक्ट्स स्टुडिओने ‘धुरंधर’ला दिला नवा आयाम

Bollywood Action Cinema : 'धुरंधर' चित्रपटाने आपल्या अचूक कास्टिंग, संगीताचा प्रभावी वापर, नाविन्यपूर्ण मार्केटिंग आणि जागतिक दर्जाच्या व्हीएफएक्समुळे (VFX) बॉक्स ऑफिसवर खळबळ उडाली असून हिंदी चित्रपटसृष्टीचा लँडस्केप बदलला आहे.
Dhurandhar Movie Review

Dhurandhar Movie Review

esakal

Updated on

प्रचारकी चित्रपट किंवा समीक्षकांवर दबाव आलेला चित्रपट ही ‘धुरंधर’ ची ओळख नाही. कलाकारांची अचूक निवड आणि काय मांडायचं याचे दिग्दर्शकाला असलेलं नेमके भान यामुळे चाकोरीबद्ध चित्रपटापेक्षा ‘धुरंधर’ वेगळा ठरतो. काय नेमके वेगळेपण आहे यात? या चित्रपटावर कुणाचा प्रभाव आहे, चित्रपटविश्‍वात या चित्रपटामुळे नेमकी काय खळबळ उडाली, या साऱ्यांचा वेध...

आपल्या देशासारख्या विविध बाबींचा समावेश असलेल्या भागात जेव्हा एखादा चित्रपट तुम्हाला आवडतो किंवा आवडत नाही, तेव्हा ते चित्रपटच्या आवडीनिवडीपुरतंच मर्यादित राहत नाही. तुम्हाला कुठला चित्रपट आवडला अथवा आवडला नाही यावरून तुम्हाला फारसं न ओळखणारी लोक जज करायला लागतात. एखादा माणूस आपल्या वैचारिक गोटातला आहे की ‘त्यांच्या’ वैचारिक गोटातला आहे? त्या माणसाच्या सामाजिक, राजकीय भूमिका काय असतील? हा माणूस डावा किंवा समाजवादी किंवा उजवा असेल का? असे अनेक निष्कर्ष चित्रपटच्या आवडीनिवडीवरून काढले जातात. ‘धुरंधर’ चित्रपट प्रदर्शित झाला आणि देशांतर्गत चालू असलेल्या वैचारिक गृहयुद्धाचा पुन्हा प्रत्यय आला. ‘धुरंधर’बद्दल फारशी सकारात्मक परीक्षणं लिहिली नाहीत म्हणून काही चित्रपट समीक्षकांचं प्रचंड ट्रोलिंग झालं. हे ट्रोलिंग इतकं मोठ्या प्रमाणावर होतं, की त्या समीक्षकांना आपले व्हिडीओज हटवावे लागले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com