मधुमेह व हृदयघात : गैरसमज

file photo
file photo
नारदमुनी : नारायण... नारायण... डॉक्‍टर साहेब... आज कोणत्या गैरसमजाबद्दल माहिती देणार? डॉक्‍टर : मधुमेह व हृदयघात यांचा अगदी घनिष्ठ संबंध आहे, आणि या विषयावर समाजात अनेकानेक गैरसमज आहेत. 70 टक्के मधुमेहींचा मृत्यू हार्टसंबंधी रोगामुळे होतो. आपण मधुमेहातील हृदयघात या विषयासंबंधित गैरसमजांवर चर्चा करू या. Myth 1: युवावस्थेत हार्ट अटॅक येत नाही. Fact : मधुमेहात हार्ट अटॅकची शक्‍यता इतर लोकांपेक्षा 2-3 टक्के जास्त असते आणि कमी वयातील हार्ट अटॅकची पण शक्‍यता मधुमेहींनाच सर्वांत जास्त असते. म्हणून मधुमेह झाल्यानंतर वर्षांतून एकदा हृदयरोगाची तपासणी करणे जरुरी असते. Myth 2 : मधुमेहींना छातीत दुखल्याशिवाय हार्टची तपासणी करण्याची आवश्‍यकता नसते. Fact : म धुमेहात पुष्कळदा हृदयघाताचे Typical Chest Pain होत नाही, कारण दीर्घ काळाचा मधुमेह असल्याने शरीरातील Nerves खराब होतात, याला Neuropathy म्हणतात. Neuropathy Nerves सैल पडतात. त्यामुळे Pain Sensationचा भास होत नाही. म्हणून हार्ट अटॅकचा (Angina Pain)चा मधुमेहींना भास होत नाही व त्यांना Pain Less Heart Attack येतो. म्हणजे मधुमेहींनी Angina Pain ची वाट न पाहता, वर्षातून एकदा हृदयरोगाची तपासणी करून घ्यायला हवी. Myth 3 : बारीक (Lean) हार्ट अटॅक येत नाही. Fact : Lean पण हार्ट अटॅक येऊ शकतो. आनुवंशिकता, धूम्रपान, तणावग्रस्तता, दीर्घकाळचा मधुमेह, अतिरिक्त चरबी, हायब्लडप्रेशर, Sedentary Lifestyle (शिथिलपणा) इत्यादी सर्व हृदयघाताचे Risk Factors आहेत Lean (सडपातळ) लोकांना जर हे Risk Factors असले, तर त्यांनाही हृदयघाताची शक्‍यता असते. Myth 4 : धूम्रपानानेच हृदयरोग होतो, पण तंबाखू किंवा तंबाखूचा गुटखा खाल्ल्याने हार्टवर परिणाम होत नाही. Fact : धूम्रपान-म्हणजे सिगारेट, विडी, तंबाखू, गुटखा, (नसचे मंजन) इत्यादींचा हार्ट अटॅक, ब्लडप्रेशर, नपुंसकता, पायाचा गॅंगरीनसोबत Direct संबंध आहे. म्हणजे तंबाखू असलेले सगळे पदार्थ शरीराच्या रक्तवाहिनीला Damage Block करत असतात. Myth 5 : काही "कार्डिएक टॉनिक' म्हणून गोळ्या, पावडर, जडीबुटी इत्यादी प्रत्येक हृदयरोगीने घ्यायला हव्या. Fact : Crude From असलेल्या कोणतीही Non-evidence/Non-scientific हर्बल/जडीबुटी गोळ्या इत्यादी शरीराच्या इतर Organ साठी सुरक्षित नसतात. Self Medication करू नये. Myth 6 : मधुमेह असल्याने बायपास सर्जरी करू शकत नाही. Fact : सर्वांत जास्त मधुमेहींची Heart Bypass Surgerie होत असते. तसेही मधुमेहींनाच जास्त प्रमाणात Multivessel Disease होतात. असे Blockage असले की बायपास करणे गरजेचे असते. शुगर नियंत्रित ठेवल्याने हृदयावर होणारे दुष्परिणाम टाळता येतात. Myth 7: "बायपास टाळा' ही सर्वांत Best Treatment आहे. Fact : जर मधुमेहींना हृदयाच्या तिन्ही मुख्य (Main) धमन्या बंद झाल्या असतील, तर हृदयरोगतज्ज्ञ Bypass सर्जरी करायचा सल्ला देतात. मधुमेही लोकांच्या रक्तवाहिन्या सामान्य लोकांपेक्षा जास्त खराब होतात व त्यांना Diffuse Disease राहतो. जास्त कठीण Blockage असल्यावर Bypass करणे जरुरी असते. Bypass सारखी Evidence Based Globally व recommended therapy जास्त सुरक्षित असते. त्यामुळे कधी कधी चुकीचा निर्णय घेतल्याने जिवाला धोका होऊ शकतो. Myth 8 : एन्जिओप्लास्टी व बायपास सर्जरीवर बऱ्याचदा दोन डॉक्‍टरांचे वेगवेगळे मत असते. Fact : कधी कधी हृदयाच्या Coronary या धमनीचा रोग Complex होऊ शकतो. जिथे प्लास्टी किंवा बायपास दोन्हींमुळे फायदा होऊ शकतो. असे Specific Lesion असल्यावर स्पेशालिस्टचा सल्ला घेऊनच उचित निर्णय घ्यावा लागतो. Myth 9: हार्टची Angioplasty झाल्यानंतर परत रक्तवाहिनी Block होत नाही व आपण पूर्णपणे बरे होतो. Fact : साधारणत: 5-10 टक्के लोकांना ऍन्जियोप्लास्टीनंतर Re-stenosis होण्याची Risk राहते. त्यामुळे तज्ज्ञ डॉक्‍टर Angioplasty बद्दल Counselling हृदयाची Angioplasty म्हणजे Cure नाही, उलट ही पुढे येणाऱ्या हार्ट अटॅकला टाळण्याची पद्धत असते. म्हणजे Life Style च्या नियमांचे पालन, डॉक्‍टरांचा सल्ला घेऊन नियमित औषध घेणे अतिशय महत्त्वपूर्ण आहे. औषधे आपल्या मनाने कमी किंवा बंद करू नयेत. Myth 10: बायपास किंवा ऍन्जियोप्लास्टीनंतर दिनचर्येत Restrictions येतात. Fact : असे नाही. उलट, Successful Heart Procedure झाल्यानंतर स्फूर्ती वाढते, कार्यक्षमता वाढते व अनुशासन पाळून पुढील आयुष्य जास्त चांगले होते. जीवनात Limitations येत नाही. आपण आपली दिनचर्या सुरू ठेवू शकतो. Myth 11: हृदयरोगी मधुमेहींना Special Stents लागतात. Fact : आजकाल, सगळे Stents Medicated म्हणजे Drug Conted असतात. त्यांची किंमत पण साधारणत: सारखीच असते. मधुमेहींना Special किंवा खूप महाग Stents लावणे आवश्‍यक नसते. नारदमुनी : नारायण... नारायण... डॉक्‍टर साहेब, आपण सांगितले होते की 70 टक्के मधुमेहींचा मृत्यू हृदयरोगाने होतो आणि प्रत्येक 6 सेकंदाला एका मधुमेहीचा मृत्यू होतो. हे सर्व टाळण्यासाठी समाजात जागरूकता आणणे आवश्‍यक आहे व त्याकरिता तुमच्या या सर्व प्रयत्नांमुळे खूप मदत होईल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com