Disclosure Day Movie Review : साय-फाय चित्रपट पाहताना विचारांना नवी दिशा; ‘डिस्क्लोजर डे’मधील चार कथांचा अनोखा प्रवास

Disclosure Day Movie Review : स्टीव्हन स्पिलबर्ग यांचा ‘डिस्क्लोजर डे’ हा चित्रपट चार समांतर कथांमधून विज्ञानकथेतील गूढ उलगडतो. साय-फाय चित्रपटांची आवड आणि वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करण्यासाठी तो नवी दिशा देतो.
Disclosure Day Movie Review

Disclosure Day Movie Review

esakal

Updated on: 

सुहास किर्लोस्कर

‘डिस्क्लोजर डे’ चित्रपट मार्गारेटच्या कथेपासून सुरू होतो, त्याचवेळी नोआह, जेन, ह्युगो अशा एकूण चार पात्रांच्या कथा समांतर पद्धतीने समजून घेता घेता चारही कथा एकमेकाशी साधर्म्य साधतात आणि त्या कथेमध्ये गूढरीत्या बघणारे प्राणी-पक्षी प्रवेश करतात. कालांतराने प्रेक्षकांना सर्व धागेदोरे उलगडू लागतात. डेव्हिड केप यांच्या पटकथेतून हे गूढ आपल्याला समजले, याचे समाधान स्पिलबर्ग प्रेक्षकांना देतो. स्पिलबर्ग चा हा सर्वोत्कृष्ट साय-फाय चित्रपट नाही परंतु असे अनवट चित्रपट बघण्याची सवय लागण्यासाठी हा चित्रपट पुढची पायरी ठरू शकतो.

साय-फाय (Sci fi) चित्रपट म्हणजे सायन्स फिक्शन. असे चित्रपट बघण्यासाठी मुळात वैज्ञानिक दृष्टिकोन असावा लागतो किंवा विज्ञानाबद्दल उत्सुकता असावी लागते किंवा असे झाले तर काय होईल अशा प्रकारे तार्किक विचार करण्याची सवय अंगी बाणवावी लागते. शालेय शिक्षणामध्ये प्रश्न विचारण्याची फार मुभा नसल्यामुळे असा दृष्टिकोन विकसित होत नाही पण विज्ञान विषयक चित्रपट वारंवार बघितल्यामुळे अशा प्रकारे विचार करण्यास चालना मिळते, निदान इतरेजन कशा प्रकारे विचार करतात आणि आपण असा विचार अद्याप का करत नाही, तार्किक वाद-विवाद असलेल्या चर्चा आपण का करत नाही, असे प्रश्न विचारण्यास सुरुवात होते.

Loading content, please wait...