Premium|What Is Dombari Marathi Film : ...आणि शांतता घाबरली

Dombari Film Story and Cast : ‘डोंबारी’च्या निमित्ताने कलाकाराच्या आठवणींतून चित्रपटाच्या पडद्यामागची गंमत, डोंबारी समाजाचे संघर्षमय जीवन, सामाजिक प्रश्न आणि कलाकारांमधील अनुभवविश्व उलगडत जाते.
Dombari Film Story and Cast

Dombari Film Story and Cast

esakal

Updated on

डॉ. मिलिंद शिंदे

‘‘आरं, अबबा बबा बबा...

या माणसाला पयलं बाहेर काढा...

या माणसाला अजिबात दया माया माहीत नाही.., याला पयलं बाहेर काढा... ’’

‘डोंबारी’ या सिनेमासाठी आनंद शिंदे एक गाणं गात होते... या सिनेमाचा मुहूर्त आनंद शिंदे यांच्या गाण्याच्या रेकॉर्डिंगनं झाला होता... ते स्टुडिओमध्ये काचेच्या पलीकडे माइकवर गाणं गात होते. तेव्हा मी अलीकडच्या रेकॉर्डिंग रूममध्ये आत आलो, तेव्हा आनंद शिंदे गाणं थांबवून...

या माणसाला पयलं बाहेर काढा, असं म्हणत होते. उपस्थितांमध्ये हशा उमटला...

नुकताच ‘नटरंग’ सिनेमा येऊन गेला होता... त्यात मी अतुल कुलकर्णीवर सिनेमात अत्याचार करतो. त्या प्रसंगाच्या अनुषंगाने आनंद शिंदेचे संबंधित उद्‍गार होते... सिनेमाचं नाव ‘डोंबारी’.

यात त्या समाजाची व्यथा, त्यांचं सामाजिक स्थान जीवनाशी झगडा, हक्क मागण्यासाठीचा लढा अशा विषयांचा ऊहापोह होता...

सिनेमात मधू कांबीकर, मेघा घाडगे, हेमांगी कवी, दीपक करंजीकर ही कलावंत मंडळी होती तर चारुदत्त दुखंडे कॅमेरामन होते.

मेघा घाडगे आणि हेमांगी कवी या माझ्या दोन बायका या सिनेमात.

पहिली मरते (मेघा घाडगे) मग तिचीच बहीण आपल्या लहान मुलाचा सांभाळ करेल, म्हणून या बहिणीशी दुसरा विवाह लावला जातो. ती हेमांगी कवी... मधू कांबीकर माझी आई... असा कुटुंब आलेख.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com