
अध्यक्ष म्हणून लक्षणीय कामगिरी करण्यावर भर देण्यापेक्षा डोनाल्ड ट्रम्प यांना डिल करण्यात जास्त स्वारस्य आहे. त्यामुळे आक्रमक घोषणा करण्यावर त्यांचा भार आहे. ट्रम्प यांना जगातील कोणत्याही युद्धात अडकायचं नाही. हे एका परीनं बरंच घडतं आहे.
नवे युद्ध नको आणि युरोपच्या दारात सुरू असलेलं युक्रेनचं युद्ध संपावं, यासाठी रशियाचे अध्यक्ष पुतीन यांचा कधी गौरव तर कधी माझं ऐकलं नाही तर टोकाचे निर्बंध लादू असा आक्रमक सूरही ट्रम्प लावतात. इथंही त्यांना रशियावर प्रत्यक्षात काही कारवाईपेक्षा त्याचं भय दाखवून युद्ध संपवण्याला प्राधान्य द्यायचं असेल.