
अमेरिकेचे ४७ वे राष्ट्राध्यक्ष म्हणून येत्या २० जानेवारीला डोनाल्ड ट्रम्प सत्तापदाची सूत्रे हाती घेणार आहेत. तथापि, नोव्हेंबर २०२४ मध्ये राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीचा अंतिम निकाल जाहीर झाल्यापासून ट्रम्प यांनी अमेरिकेतील आगामी काळातील धोरणे कशा स्वरूपाची असतील, याविषयीची रूपरेषा स्पष्ट करण्यास सुरुवात केली असून ती करत असताना त्यांनी धक्कातंत्राचा अवलंब केल्याचे दिसत आहे.