Exam Cheating and Student Life : अभ्यास टाळण्यासाठी कॉपीचा मार्ग निवडला, पण प्रत्येक वेळी युक्ती चालतेच असे नाही

Exam Cheating and Student Life : लहानपणीची सवय मोठेपणीही कशी पाठ सोडत नाही, हे गाढवाच्या कथेतील युक्ती आणि अभियांत्रिकी विद्यार्थ्याच्या कॉपीच्या सवयीतून समजते. तात्पुरता फायदा परिस्थिती बदलताच अडचण ठरू शकतो. ही कथा आजच्या शिक्षणव्यवस्थेलाही प्रश्न विचारते.
Exam Cheating and Student Life

Exam Cheating and Student Life

esakal

Updated on: 

सारिका चाटुफळे-कुलकर्णी - sarikachatuphale.kulkarni@gmail.com

आता कथेचे नाव वाचून तुम्हाला असा प्रश्न पडला असेल की गाढव हे त्याच्या मूर्खपणासाठीच प्रसिद्ध असते. त्यात विशेष काय? मालकांची ओझी वाहण्याचे काम करणारे हे गाढव आहे. एकदा पाठीवरील मिठाचे ओझे घेऊन जाताना गाढवाचा पाय घसरला आणि ते पाण्यात पडले. पाण्यात पाठीवरील मीठ विरघळून गेले. गाढवाला युक्ती समजली. तो रोज रोज तसेच करू लागला. एके दिवशी मात्र पाण्यात भिजल्यावर पाठीवरचे ओझे जड झाले. कारण त्या दिवशी पाठीवर कापूस होता. जो पाण्यात भिजून अजून जड झाला. ही कथा आधुनिक काळात कशी असेल?

अभियांत्रिकी महाविद्यालयात शिकणाऱ्या अभिजितला लहानपणीपासून कॉपी करून पेपर देण्याची सवय होती. अभ्यासात तो यथातथा असला तरी व्यवहारात मात्र उत्तम होता. अभ्यास करणे मात्र त्याच्या जीवावर येई. शेजारच्या बाळ्याने त्याला एकदा कॉपी करण्याची टेक्निक शिकवली तेव्हापासून तो कॉपी करण्यात एकदम पटाईत झाला होता. बाळ्यालादेखील ठाऊक नसलेले कॉपी करण्याचे कितीतरी वेगवेगळे उपाय अभिजितने शोधून काढलेले होते.

Loading content, please wait...