मानससूत्र : स्वतःचं करा विश्लेषण

आपले विचार, भावना, वागणं आणि अवगत तंत्र-कौशल्यं या सगळ्याचा परिणाम जीवनावर होत असतो. आपल्या सर्वांनाच आयुष्यात यशस्वी व्हायचं आहे.
मानससूत्र : स्वतःचं करा विश्लेषण
Updated on
Summary

आपले विचार, भावना, वागणं आणि अवगत तंत्र-कौशल्यं या सगळ्याचा परिणाम जीवनावर होत असतो. आपल्या सर्वांनाच आयुष्यात यशस्वी व्हायचं आहे.

- डॉ. जयश्री फडणवीस

अनेकदा आपल्याला इतरांचे गुण-दोष सहजपणे दिसतात; पण स्वत:बद्दल चार चांगल्या-वाईट गोष्टी सांगा म्हटलं, तर गोंधळ उडतो. आपण विचार केलेला नसतो, की मी नक्की कोण आहे? माझ्यात चांगलं वाईट काय आहे? भविष्यात नक्की काय करायचंय? इथं आवश्यक आहे ते स्वविश्लेषण. ‘मी’ कोण, याचा शोध!

आपले विचार, भावना, वागणं आणि अवगत तंत्र-कौशल्यं या सगळ्याचा परिणाम जीवनावर होत असतो. आपल्या सर्वांनाच आयुष्यात यशस्वी व्हायचं आहे. स्वप्नांची पूर्तता करायची आहे; पण यासाठी नक्की काय करायचंय ते कळत नाही आणि म्हणूनच समजावून घेऊ या एक व्यवस्थापन तंत्र ‘SWOT Analysis.’

व्यवस्थापन कौशल्यांमध्ये ‘SWOT’ हे तंत्र एखाद्या व्यवसायाचं मूल्यमापन अथवा परीक्षण करण्यासाठी वापरण्यात येतं. तीच पद्धत स्वविश्लेषणासाठीही परिणामकारकरित्या वापरता येते. आयुष्याचा शोध घेताना, स्वतःची कारकीर्द ठरवताना; तसंच ध्येय, उद्दिष्ट गाठताना वापरता येतं.

यात सर्वप्रथम लक्षात ठेवायचं ते म्हणजे प्रत्येक स्व-विश्लेषण करताना स्वतःशी प्रामाणिक राहणं. SWOT Analysis मध्ये अंतर्गत (Internal); तसंच बाह्य (External) व्यक्तिमत्त्वाचा सखोल विचार करता येतो. SWOT हा शब्द चार शब्दांच्या अद्याक्षरांपासून तयार करण्यात आला आहे : Strengths (बलस्थानं), Weaknesses (न्यूनता), Opportunities (उपलब्ध संधी), Threats (भीती). हे घटक SWOTचे चार घटक.

Strengths आणि Opportunity मध्ये एक पुसट रेषा आहे. S म्हणजे तुमची आत्ताची बलस्थानं हा तुमचा वर्तमानकाळ, तर O उपलब्ध संधी हा भविष्यकाळ. उदाहरणार्थ, नुसतेच ग्रॅज्युएट असाल, तर एखादी साधीशी नोकरी मिळेल; पण एमबीए केलं असेल, तर एखाद्या लहानशा कंपनीत एकदम मॅनेजरची पोस्टही मिळू शकते. Your strengths will create opportunity. तसंच न्यूनतेतून निर्माण होतात T भीती. अभ्यासच केला नसेल, तर नापास होण्याचं भय आहेच ना! म्हणूनच न्यूनतांचं सतत बलस्थानात परिवर्तन करत राहणं, विधायक विचार करत राहणं. SWOT Analysis प्रामुख्यानं दोन पद्धतींनी केलं जातं. चार घटकांचा तक्ता तयार करून चारही स्तंभ प्रामाणिकपणे भरणं.

अथवा ४ चौकोनांतही SWOT करता येतो. प्रत्येक रकाना अथवा चौकोन भरताना स्वतःला प्रश्न विचारा. काही प्रश्न उदाहरणादाखल देत आहे.

SWOT analysis मुळे स्वतःच्या व्यक्तिमत्त्वाच्या गुणदोषांचा लेखाजोखा घेता येतो- ज्यातून भविष्यातील ध्येयं आणि उद्दिष्टं ठरवता येतात. बलस्थान वाढवताना experts ची मदत घ्या. न्यूनता स्वीकारून त्यावर काम करा. नैराश्य, औदासिन्य यासारख्या गोष्टींकरता वेळीच मानसशास्त्रज्ञांना भेटा. लाजू नका. वाईट सवयींवर मात करताना नक्कीच सर्वांची मदत घ्या. swot करा. यशाचा मार्गावर वेगानं आगेकूच करा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.