

Jagar Vishwajanannicha
esakal
‘सर्व मंगल मांगल्ये....’ हा देवीचा श्लोक देवीपूजन, नवरात्रात व अन्य धार्मिक विधीत म्हटला जातो. यात देवीला उद्देशून नारायणी, शिवस्वरूपिणी, जगज्जननी, सर्व मंगलांची जननी, सर्व इच्छा पूर्ण करणारी, शरण आलेल्यांना आश्रय देणारी अशी संबोधनपर विशेषणे वापरून नमस्कार केला आहे. या विश्वाच्या उत्पत्तीला कारण ठरलेल्या स्त्रीशक्तीला प्राचीन काळी देवी मानले जात असे. अशा सर्जनशील स्त्रीशक्तीच्या व्यापक, सांस्कृतिक आणि आध्यात्मिक अर्थाचा शोध डॉ. कल्याणी हर्डीकर यांनी ‘जागर विश्वजननीचा’ या पुस्तकातून घेतला आहे.