सामान्य-असामान्य : आजच ‘फैसला’

सायकिॲट्रिस्ट आणि इतर डॉक्टर यात फरक काय? तर लॅब व मशिनचा संपूर्ण अभाव. त्यामुळे शंकेखोरांना सतत वाव. दुसरे म्हणजे सायकोथेरपी म्हणजे मानसोपचार.
Psychiatrist and doctor
Psychiatrist and doctorsakal
Summary

सायकिॲट्रिस्ट आणि इतर डॉक्टर यात फरक काय? तर लॅब व मशिनचा संपूर्ण अभाव. त्यामुळे शंकेखोरांना सतत वाव. दुसरे म्हणजे सायकोथेरपी म्हणजे मानसोपचार.

- डॉ. संजय वाटवे

सायकिॲट्रिस्ट आणि इतर डॉक्टर यात फरक काय? तर लॅब व मशिनचा संपूर्ण अभाव. त्यामुळे शंकेखोरांना सतत वाव. दुसरे म्हणजे सायकोथेरपी म्हणजे मानसोपचार. मानसोपचाराच्या अनेक तंत्रांपैकी एक महत्त्वाचे तंत्र म्हणजे कौन्सेलिंग म्हणजे सल्लामसलत. कौन्सेलिंग मागितल्यानंतरच दिले जाते. नाहीतर स्वानुभवावरून जवळचे लोक सल्ले देतच असतात की! शास्त्रीय कौन्सेलिंग म्हणजे व्यक्तिमत्त्व आणि परिस्थितीचा संपूर्ण अभ्यास करून त्यांची सांगड घालण्याचा सल्ला. या कामासाठी डिसपॅशनेट आणि न्यूट्रल एक्सपर्ट हवा. संकटामुळे गांगरलेल्या पेशंटला आधार व पाठिंबा द्यावा लागतो; तसेच पुढील आयुष्यासाठी हितकर असेच मार्गदर्शन करावे लागते.

त्यामुळे तत्त्वनिष्ठ कौन्सेलर फार काळ ‘रॉजेरियन थेरपी’ वापरत नाही. त्यामुळे दर वेळेला अभ्यासू सल्ला लोकप्रिय असेलच असं नाही. विशेषतः मॅरेज कौन्सलिंगमध्ये अनेक लोक भाग घेत असतात आणि त्या सगळ्यांच्या भावना पराकोटीला गेलेल्या असतात. जितके लोक तितक्या थेअऱ्या. सगळ्यांना खूश करणे शक्य नसते. ज्याच्याशी माझी थेअरी जुळते त्याला मी ‘इंडियातला बेस्ट सायकिॲट्रिस्ट’ वाटतो. ज्यांच्याशी जुळत नाही त्यांना माझ्या सायकोलॉजीविषयी अज्ञान आहे असे वाटते. असे नाराज पेशंट माझी यशस्वी होऊ शकणारी ट्रीटमेंट स्थानमाहात्म्याचा गैरफायदा घेऊन ट्रीटमेंट उद्ध्वस्त करत राहतात किंवा सोशल मीडियावर बदनामी करत राहतात.

कौन्सेलरकडे जाताना सल्ला ऐकण्याच्या उद्देशाने जायला पाहिजे आणि मुख्य म्हणजे कोरी पाटी घेऊन जायला पाहिजे. नाहीतर असा प्रसंग ओढवतो. मी नेहमीप्रमाणे सकाळी आठच्या ठोक्याला दवाखान्यात पोहोचलो. मोठी चर्चासत्रे असल्यामुळे केवळ अपॉइन्टमेंटनेच काम चालते. जो तो आपल्या वेळेला येतो. त्यामुळे एका वेळेला दवाखान्यात गर्दी नसते. असे असूनही मासळी बाजार असल्यासारखी गर्दी जमली होती. मोठमोठ्या आवाजात वादविवाद चालू होते. मी माझ्या रूममध्ये गेलो. रिसेप्शनला विचारले, ‘काय प्रकार आहे?’ मला उत्तर मिळाले, ‘आठचे पेशंट वेळेत आलेत. दोघेच जण आहेत; पण साताऱ्याचे साडेअकराचे नवीन पेशंट आलेत. मॅरेज कौन्सेलिंगची केस आहे.

त्यांच्याबरोबर २२ नातेवाईक आले आहेत. ते हमरीतुमरीवर आले आहेत.’ मी आठच्या पेशंटना माझ्या रूममधे बसवून मीच वेटिंग हॉलमधे गेलो. मी विचारले, ‘‘काय मॅटर आहे? एवढे लोक कशासाठी आले आहेत? आणि आठलाच का येऊन बसलात?’ मला सांगण्यात आले, की ‘पसंतापसंतीने दीड वर्षांपूर्वी लग्न झाले; परंतु सारखी भांडणे होतात. सात-आठ मीटिंग झाल्या; पण मिटत नाही. दोन्हीकडचे दहा-बारा, दहा-बारा नातेवाईक आलो आहोत. ‘आजच फैसला’ करून टाका.’

मग मी वेटिंग हॉलमध्येच group counselling केलं. ‘‘पहिली गोष्ट म्हणजे मला केसविषयी काही माहिती नाही. मला आधी prima facie केस जाणून घ्यावी लागेल. मग दोघांच्या तीन-चार स्वतंत्र मीटिंग्ज घ्याव्या लागतील. वादाचे मुद्दे समजून घ्यावे लागतील. त्यावेळेला निर्माण होणाऱ्या राग, द्वेष, संताप, संशय, अपेक्षाभंगाची भावना, फसवणुकीची भावना या घालवण्यासाठी गोळ्या सुरू होतील. त्याशिवाय लॉजिक समजणार नाही. दोघेही गोळ्यांमुळे ‘counselling Ready’ झाले, की confrontation. समोरासमोर बसवून मुद्द्यांची चर्चा केली जाईल. गैरलागू मुद्दे वगळले जातील. मग उरते contingency contracting म्हणजे तडजोडीचा मसुदा. त्या त्या वेळी जसे नातेवाईक लागतील तसे बोलवले जातील. उगाच झुंबड करून गोंधळ करू नका.

‘दुसरं म्हणजे सरळसरळ दोन गट पडलेले दिसतात. मी वकील नाही, त्यामुळे मी कोणाच्या बाजूचा नाही. कोण किती चुकलं हे शोधण्याचं काम माझं नाही. दोघेही मला सारखेच आहेत. माझं काम निरोगी संसार उभा करणे. तिसरं म्हणजे मी जज्जसुद्धा नाही. निवाडा, निकाल हे मी करणार नाही. ‘फैसला’ सगळ्यांनी मिळून करायचा आहे माझ्या सल्ल्यानुसार. थोडक्यात आज ‘फैसला’ होणार नाही. मोजके तीन-चार जण बसा.’ मी माझ्या कामाला निघून गेलो.

आज ‘फैसला’ नसल्यामुळे नाराज होऊन एक एक जण बाहेर पडला. त्यांच्या comments, staff ने ऐकल्या. ‘डॉक्टरांच्यात दम दिसत नाही.’ ‘दवाखान्यात आल्यावर येवढा वेळ कशाला लागतो?’ ‘आमचे गावाकडचे डॉक्टर पेशंट बघायच्या आत इंजेक्शन भरून तयार असतात.’, ‘अहो, जास्त सीटिंग्ज म्हणजे जास्त फी’... हळूहळू केससकट सर्वच्या सर्व लोक निघून गेले. त्यांनी आजच्या आज कोणता आणि कसा ‘फैसला’ घेतला देवच जाणे!

justice delayed is justice denied हे बरोबर आहे; पण justice hurried is justice Buried हेही खरं आहे.!!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com