द सन विल राइज

द सन विल राइज

यशाच्या शिखरावर पोचलेली हिंदी बॉलिवूड इंडस्ट्रीत अभिनेत्याइतकीच साइनिंग अमाउंट घेणारी दीपिका पदुकोन जेव्हा तिच्या इंटरव्ह्यूमध्ये सांगते, ‘आज मी स्टार असले, तरी माझ्या आयुष्यात एक काळ असा आला होता, की मी डिप्रेशनमध्ये गेले होते आणि त्यातून बाहेर पडण्यासाठी मीही समुपदेशन घेतले होते.’ तिला मुलाखतीत पुढे विचारले गेले, ‘असे खुलेआम सांगायला तुला कसे वाटते?’ तेव्हा ती म्हणाली, ‘यात लपवण्यासारखं काहीच नसतं. मदतीची गरज असते, तेव्हा ती घ्यायलाच हवी. जगातले नामवंत खेळाडू, कलाकार, शास्त्रज्ञ, उच्च अधिकारी अगदी सामान्य माणसांनाही आयुष्यात समुपदेशनाची गरज पडू शकते.’

दीपिकाच्या संवादातून ‘समुपदेशन’ किती महत्त्वाचे आहे, याची जाणीव होते. आपल्या सोसायटीत एखाद्याला समुपदेशनाबद्दल सुचविले, तरी त्याच्या डोक्‍यात काहीतरी ‘केमिकल लोच्या’ झालाय, असे लोकांना वाटते. वास्तविक, आपण सगळेच आजकाल खूप ‘स्ट्रेसफुल लाइफ’ जगतो. कॉलेज, मित्र-मैत्रिणी, पीअर प्रेशर, गर्लफेंड, बॉयफ्रेंड, रिलेशनशिप, फॅमिली, करिअर, प्रोफेशन, सॅलरी आणि स्वतःला प्रूव्ह करताना आपण कुठल्यातरी अडचणीमध्ये अडकतो. त्यातून बाहेर पडायचे, हे कळत असते. पण, ‘कसे’ ते मात्र कळत नाही. अशा वेळी ‘स्ट्रेस’ वाढत जातो. कोणाशी बोलावेसे वाटत नाही. कशातही रमत नाही. फेसबुक, व्हॉट्‌सॲप, फ्रेंड्ससुद्धा बकवास वाटायला लागतात. चक्रव्यूहातून कसे सुटायचे, याचे उत्तर सापडत नाही. 

अशा वेळी घरच्यांशीसुद्धा शेअर करावेसे वाटत नाही. कारण, त्यांना आपले ‘इन अँड आउट्‍स’ माहीत असतात. कधी कधी घरच्यांशी आपली ‘फ्रीक्वेन्सी मॅच’ होत नाही. कोण खरेच उपयोगाला येतो अशा वेळेला? तर तो ‘काउंसिलर’! त्यांच्याकडे जाण्यात काहीच चुकीचे नाही. मनातले दुःख, त्याच्यातला कडवटपणा, डिप्रेशन, अँगर, कटकट, भीती बाहेर पडणार नाही तोपर्यंत त्याच्यात नवे काही कसे भरता येईल? ‘फर्स्ट एम्प्टी युवर कप विथ काउंसिलिंग’ नाही का? 

आपण आपल्याला समजून घेणे, चुकले तर स्वतःला सावरणे, त्यासाठी काय करायचे, हेच तर काउंसिलिंग सांगते ना? ब्रेकअप झाले की आता लाइफचा एन्ड झाला. डिअरेस्ट व्यक्तीचा अचानक मृत्यू झाला, की जगण्यावरचा विश्‍वासच उडाला, नवरा-बायकोशी पटले नाही की आपले नशीबच फुटके, मुले चुकीची वागली की आमचे संस्कारच कमी पडले, अशा गिल्टी भावना घेऊन जगण्यापेक्षा एक्‍सपर्टाइजची मदत घ्यायला हवी. कारण, ते यासाठी परफेक्‍ट मेडिसिन असते. समुपदेशक तुमचे प्रॉब्लेम, तुमचे दुःख तुमच्या चष्म्यातून पाहतो म्हणून तो तुम्हाला अचूक समजू शकतो. आपला प्रॉब्लेम हा आपल्याला इतरांपेक्षा नेहमीच खूप मोठा, क्रिटिकल, कॉम्प्लिकेटेड आणि कधीही न सुटणारा वाटतो. पण, समुपदेशकाकडे एक असा दृष्टिकोन असतो जो आपल्याजवळ नसतो. आपल्याला जे दिसत नाही तो ऑप्शन ‘तो’ आपल्याला दाखवतो. समुपदेशन घेतल्याने आपल्याला तो नक्कीच सोडवता येतो. आपण ‘ओव्हरकम’ करू शकतो, यात कुठलाच कमीपणा नाही. एखाद्याने गरज असताना समुपदेशकाची मदत घेतली, तर सगळे जग बदलेल असे नाही. पण, त्या व्यक्तीचे स्वतःचे आयुष्य नक्कीच बदलू शकते. स्वतःला रिबिल्ड करण्याची संधी आपण समुपदेशनामधून स्वतःला देत असतो. हेच समुपदेशन सांगत असते, हे समजून घ्यायला हवे. 

जो माणूस प्रॉब्लेममध्ये असतो, त्याला साथ-सोबत हवी असते. एक मार्ग हवा असतो आणि एक विश्‍वास हवा असतो की, ‘Even the darkest night will end and the sun will rise.’ समुपदेशनामधून हा गमवलेला विश्‍वास नक्कीच परत मिळवता येतो. म्हणूनच म्हणतात, ‘When mind, body and spirit are in harmony happiness is the natural result.’ 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com