New Marathi Book : मराठी पौराणिक नाटकांचा अभ्यास; 'मिथक आणि नाटक' पुस्तकाचे सखोल विवेचन

History of Marathi Mythological Plays : मराठी पौराणिक नाटकांच्या मुळाशी असलेल्या 'मिथकां'चा शोध! डॉ. तारा भवाळकर यांनी १८४३ ते १९२० या कालखंडातील नाट्यपरंपरेचे केलेले सखोल विश्लेषण; विष्णुदास भावे, किर्लोस्कर आणि खाडिलकरांच्या योगदानाचा वेध घेणारे महत्त्वपूर्ण पुस्तक.
History of Marathi Mythological Plays

History of Marathi Mythological Plays

esakal

Updated on

जयदीप पाठकजी - Jaydeep.Pathakji@esakal.com

लोकसाहित्य, लोककला आणि संस्कृतीच्या अभ्यासक डॉ. तारा भवाळकर यांचे ‘मिथक आणि नाटक’ हे पुस्तक मराठी पौराणिक नाटकाच्या प्रारंभापासून १९२० पर्यंतची जडणघडण मांडते. भवाळकर यांच्या ‘पीएचडी’च्या प्रबंधाचे हे लघुरूप आहे. इंग्रजीतील ‘मिथ्’ या संज्ञेचा भारतीय पर्याय म्हणजे मिथक अर्थात पुराणकथा किंवा दैवतकथा. मराठी पौराणिक नाटकांमध्ये त्याचा उपयोग कसा झाला, याबाबत सविस्तर विवेचन हे पुस्तक करते.

पौराणिक नाटकांच्या जडणीघडणीतले विविध टप्पे उदाहरणासह लेखिका येथे विस्तृतपणे मांडते. मिथक आणि नाटक यांचे अतूट स्वरूपाचे नाते आहे. मिथकातूनच नाटकाचा उगम झाला आणि ते पुढे उत्क्रांतही झाले. हे तथ्य समोर ठेवूनच मराठी नाट्यपरंपरेच्या विकासाकडे लेखिका पाहते. विष्णुदास भावे, अण्णासाहेब किर्लोस्कर आणि काकासाहेब खाडिलकर या तिघांच्या नाटकांच्या संदर्भात हा सारा भाग विस्ताराने पुस्तकात येतो. आधुनिक मराठी रंगभूमीचा प्रारंभ सन १८४३ मध्ये सांगलीत विष्णुदास भावे यांनी ‘सीतास्वयंवराख्यान’ या नाटकातून केला. तो या पुस्तकातील विवेचनाचा आरंभबिंदू आहे. नाटकाची कथा, त्यातील गीते, नृत्य-संगीताची जोड, रंगभूषा आणि वेशभूषा अशा विविध दृष्टिकोनातून पौराणिक नाटकांकडे लेखिकेने पाहिले आहे. १८४३ ते १९२० हा तसा विस्तृत असा पट. या कालखंडाचे विष्णुदासी नाट्यकवितेच्या प्रभावातील कालखंड (१८४३-१८६०), गद्य-पद्यात्मक पौराणिक नाटकांचा कालखंड (१८६० ते १८८०), किर्लोस्करांच्या संगीत नाटकांचा उदयकाल (१८८० ते १९००) आणि संगीत नाटकांच्या उत्कर्षाचा कालखंड (१९०० ते १९२०) असे चार टप्पे करण्यात आले असून, या कालखंडानुसार विवेचन पुस्तकात करण्यात आले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com