वाशिम जिल्ह्यातल्या मंगरुळपीर तालुक्यातील वनोजा गाव. गावाला दुष्काळ पाचवीला पुजलेला, उजाड माळरानावर घोंगावणारा वारा आणि जमिनीची काहिली करणारं दाहक ऊन्ह. मात्र गेल्या दहा वर्षांत या गावानं फळबागेची वाट निवडल्याने आता संत्रा बाजारपेठेत जगाच्या नकाशावर आलं आहे. पाण्याचे अचूक नियोजन आणि युवा पिढीने तंत्रज्ञानाच्या साथीने हे गाव विदर्भाचा कॅलिफोर्निया अशी ओळख निर्माण करत आहे.