ugach sangitlelya katha book
sakal
‘मी कवी असल्यामुळे वाचक आणि समीक्षक यांना सोप्या भाषेतील कथा आवडतील का? हा प्रश्न माझ्या मनात येतो. म्हणूनच या कथासंग्रहाचे शीर्षक ‘उगाच सांगितलेल्या कथा’ हे निश्चित केले आहे.’ असे पुस्तकाचे लेखक विवेक जोशी आपल्या कथासंग्रहाच्या मनोगतात म्हणतात. त्यामुळे कथासंग्रहाचे मुखपृष्ठ पाहताना पडलेल्या प्रश्नाचे उत्तरही वाचकाला मिळते. विविध विषयांवरील बारा कथांचा हा संग्रह नुकताच वाचकांच्या भेटीस आला आहे.