
नमोजीभाई मयुरासन करतात. ते पाहून आसपासच्या बागेतले मोर लगबगीने ‘कोण बरं हा आपला भाईबंद आलाय?’ अशा कुतूहलाने गोळा होतात. नमोजीभाई त्यांना खिशातून ‘भरुच ना प्रख्यात खारा सिंगदाणा’ काढून खिलवण्याचा प्रयत्न करतात. अब आगे…
ढिंग टांग : आठ वरस!
स्थळ : ७, लोककल्याण मार्ग. वेळ : बप्पोरे आठ वाग्या!
प्रधानसेवक नमोजी बंगल्याच्या हिरवळीवर योगासने करत आहेत आणि श्रीमान मोटाभाई बंगल्याच्या पायऱ्यांवर बसून त्यांच्याकडे खचलेल्या नजरेने बघत आहेत. कुणीही देहाच्या वारेमाप घड्या घालायला लागले की मोटाभाईंचा धीर खचतो! नमोजीभाई मयुरासन करतात. ते पाहून आसपासच्या बागेतले मोर लगबगीने ‘कोण बरं हा आपला भाईबंद आलाय?’ अशा कुतूहलाने गोळा होतात. नमोजीभाई त्यांना खिशातून ‘भरुच ना प्रख्यात खारा सिंगदाणा’ काढून खिलवण्याचा प्रयत्न करतात. अब आगे…
नमोजीभाई : (मोरांना दाणे खिलवत) ऑ…ऑ…ऑ…अरे आव ने गधेडा!
मोटाभाई : (तंद्री भंग पावून) मने शुं कह्युं?
नमोजीभाई : (वैतागून) आ मोर जुओ ने! हुं सिंगदाणा आपू छुं, पण खातोज नथी! खातो नथी, अने मने पण खावा देतो नथी!! गधेडा!!
मोटाभाई : (अति विनम्रतेने) जवां दो, भाई! दिल्लीच्या मोर असाच हाय! आठ वरस झ्याला पण दिल्लीच्या मोरलोगांना अजुनथी आपडी ओळखाण नथी पडी!...आजना दिवस बहु सुभ सुभ छे! आजे आपडे आठ वरस थई गया!!
नमोजीभाई : (प्रश्नार्थक) आजे कुणाच्या बर्थ डे हाय के?
मोटाभाई : (भक्तिभावाने) हां, आपडे कमळराजना बर्थडे छे!! आठ वरसपूर्वी एज दिवस तमे अमदावादथी दिल्ली आव्या हता! याद छे के नथी?
नमोजीभाई : (गुदगुल्या झाल्यागत) ओह! हुं तो भूली गया हता! तेला आठ वरस झ्याला काय? आहा! केटला मज्जानुं दिवस हता!! (आठवणीत रमून गाणं गुणगुणत) हम मोदीजी को लाऽऽनेवालेऽऽ हैऽऽ , अच्छेऽऽ दिन आनेऽऽवालेऽऽ हैऽऽ…’ (मोरांना बोलावत) ए मोरलोग, आवजो, खारासिंग खावजो!! आजे पार्टी छे आपडी! ऑ…ऑ…ऑ…
मोटाभाई : (ओशाळल्यागत) मने तो आजपण बध्दा स्वप्न जेवा लागे छे! असा वाटते के बध्दा कालज घडला!!
नमोजीभाई : (स्वखुशीत) चोक्कस!
मोटाभाई : (खाली मान घालून) प्रोब्लेम असा हाय के जनतेला पण अजून असाच वाटते!!
नमोजीभाई : (अभिमानाने) आठ वरस मां शरम वाटेल असा एक पण काम नाय केला आपण! गेल्या आठ वरसमधी आपला कोणता काम बेस्ट झ्याला असा तुम्हाला वाटते?
मोटाभाई : (भोळेपणाने) नोटबंदी?
नमोजीभाई : (नाक मुरडून) नारे बाबा, ना!
मोटाभाई : (बोटं मोडत) वन रँक वन पेन्शन? ट्रिपल तलाक? स्वच्छता अभियान? युरिया ? उज्वला योजना? (नमोजीभाई प्रत्येक खेपेला ‘नाही नाही’ अशी मान हलवतात. मोरही तश्शीच मान हलवतात.)
नमोजीभाई : (प्रोत्साहन देत) सोचो सोचो!
मोटाभाई : (उजेड पडल्यागत) सांभळ्यो! त्रणसोसत्तर कलम? अयोध्या?
नमोजीभाई : (शेवटी उत्तर देत) कोंग्रेसना सूपडा साफ थई गया!!
मोटाभाई : (मान्य करत) वात तो साच्ची छे!! मने याद आव्या…कोंग्रेसवाल्यांनी एक ग्रीटिंगकार्ड पाठवला हाय. ए कहे छे के ‘‘आठ वरस तो जुमलाबाजी मां गया! आपडे गुजराथी भासा मां एक कहेवात छे- दाळ बगडे तो दिवस बगडे, अथाणु बगडे तो साल बगडे अने राजा बगडे तो भव बगडे!! कछु सांभळ्यो? ’’
नमोजीभाई : (उडवून लावत) आ तो आपडेमाटे नथी! दाळ, अथाणु अने राजा तो कोंग्रेसना बगड्या ने? जे श्री क्रष्ण!!