Premium|Electoral Merit in Politics : चुकीच्या नजरा रोखण्यासाठीच

Electoral Merit and Political Satire : निवडणुकीतील उमेदवारी, स्थानिक संस्थांवरील वर्चस्व, मतदारांशी असलेले हितसंबंध आणि जातीय समीकरणांवर उपरोधिक भाष्य करत राजकारणातील सत्ताकारणाचे वास्तव विनोदी शैलीत मांडले आहे.
Electoral Merit in Politics

Electoral Merit in Politics

esakal

Updated on: 

डॉ. मिलिंद शिंदे

‘‘अहो, झाशीची राणी, सावित्रीबाई फुले, इंदिरा गांधी, मार्गारेट थॅचर यांची नावं घेऊन निवडणूक जिंकता येत नाही ना मॅडम... त्याच्यासाठी ‘इलेक्टिव्ह मेरिट’ लागतं. ते आमच्याकडं आहे.’’

‘‘नाहीतर काय. हेच बघा ना. इथला दूध संघ आमचा, कारखाना आमचा, बाजार समिती आमची, पंचायत समिती - झेडपी आमची, पाण्याची बाटली आमची, दुधाची पिशवी आमची, शाळा-कॉलेजेस आमचे... आणि या सगळ्या आस्थापनेत काम करणारे कर्मचारी आमचे, म्हणजेच निमित्तानं ते आमचे मतदार झाले का नाही? हे आम्हाला सोडून कुणाला मतदान करणार? आम्हीच त्यांचे तारणहार...’’

‘‘मॅडम, गावात नवीन लग्न झालं की ती नवी नवरी सगळ्यात आधी आमच्या घरी येणार. रात्रभर राहणार मग सकाळी ती तिच्या नवऱ्याच्या घरी जाणार. कोण करतं हो एवढं आदरतिथ्य? त्याला जिगरबाज काळीज लागतं...’’

‘‘आणि आजकाल मतदान कोण करतं हो?’’

‘‘जनता?’’

‘‘नाही. आजकाल जात मतदान करते आणि पैसे दिले की सगळ्यांची जात बदलते...’’

‘‘तिकीट का हो नाही आम्हाला?’’

Loading content, please wait...