
अरविंद रेणापूरकर - arvind.renapurkar@esakal.com
कोणत्याही श्रेणीतील वाहन खरेदी करताना पहिला प्रश्न असतो, मायलेज किती? गाडी ॲव्हरेज किती देते? कारण ॲव्हरेज किंवा मायलेज हा सर्वांसाठीच कळीचा मुद्दा असतो. ‘ईव्ही’मधील इलेक्ट्रिक पॅसेंजर व्हेईकलने प्रामुख्याने सरासरी किंवा मायलेजला मागे टाकत चालकाला अपेक्षेपेक्षा अधिक ‘रेंज’ दिली. मायलेजचे दडपण दूर करणाऱ्या या मोटारीने चालकाला दीर्घकाळ न थांबता वाहन चालविण्याचे स्वातंत्र्य दिले. ही वाहने एकार्थाने ‘लंबी रेस का घोडा’ ठरत आहेत.