

प्रा. विश्वास वसेकर
editor@esakal.com
मराठी साहित्यात चुकून माकून अस्तित्ववाद दिसला असेल, तर तो लेखकाच्या जगण्यातून आलेला नव्हता हे नक्की. सार्त्र (नॉशिया), काम्यू (आउट सायडर), काफ्का (मेटामॉर्फसिस), असलं तिकडचं वाचून आपल्या लेखनाला तसला ‘फ्लेवर’ देण्याचा प्रयत्न काहींनी केला. मला फक्त तो दिसतो सतीश आळेकरांच्या नाटकांत. (विशेषतः ‘महानिर्वाण’ आणि ‘ठकीशी संवाद’) २०२४ पर्यंतची ही परिस्थिती. २०२५ मध्ये आलेली नितीन कोत्तापल्ले यांची ‘गुरू’ ही कादंबरी मराठीत अस्तित्ववाद अवतीर्ण झाल्याचे पहिले उदाहरण म्हणता येईल.