कुठेही भटकंतीला जाताना आम्ही नियोजन करीत नाही. नियोजन केलेल्या ट्रिप यशस्वी होत नाहीत, हा नेहमीचा अनुभव आहे. त्यामुळे भटकंतीस येणारे सदस्य, भटकंतीच्या तारखा, जायचे किल्ले, वाहन यासारखे नियोजन आमचे शून्य असते. माझे ऑफिसमधील सहकारी गोविंद कदम आणि मी लोकलमधून घरी जात असतानाच अचानक साल्हेरला जायचं ठरलं.