वृत्तपत्रातील बातमी त्या दिवशी वेगळी माहिती देते; पण त्याचबरोबर अनेकांच्या स्मरणातही असते. अर्थात, वृत्तपत्रातील सगळ्याच बातम्यांच्या नशिबी हा योग नसतो. त्याचबरोबर सगळ्याच बातम्यांना संदर्भमूल्य असते असेही नाही..ज्येष्ठ पत्रकार राजीव साबडे यांच्या या पुस्तकात अनेक चित्तथरारक गोष्टींचे वर्णन आहे. पुस्तकाच्या शीर्षकाला त्यांनी जे उपशीर्षक जोडले आहे, त्यातूनच या पुस्तकाची प्रकृती कळते. ‘विविध घटनांचे गोष्टीरूप चित्रण’ या त्यांनी दिलेल्या उपशीर्षकावरून आतमध्ये काय वाचायला मिळणार याची कल्पना येते..दोन भागांतील या पुस्तकामध्ये देशातील आणि परदेशांतील घडामोडींची माहिती मिळते. ‘सकाळ’ या अग्रगण्य दैनिकात ३४ वर्षे संपादकीय विभागात विविध पदांवर काम केलेल्या साबडे यांनी पुण्यातील काही घटना आणि त्या संदर्भात प्रसिद्ध झालेल्या केवळ बातम्या न सांगता त्यामागची पार्श्वभूमी, तसेच त्या काळातील पुणे, तसेच पुण्याच्या जीवनमानावर झालेले परिणाम असे सगळे स्पष्ट केले आहे..हे पुस्तक त्यातल्या माहितीमुळे व लेखनशैलीमुळे जितके रंजक झाले आहे, तितकेच संदर्भाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे ठरले आहे. पहिल्या भागात रजनीश आश्रम, जनरल अरुणकुमार वैद्य यांची हत्या, जोशी-अभ्यंकर हत्याकांड, टेल्को कुटुंब, मार्केट यार्डचे स्थलांतर आणि पुण्यातील पारशी समाजाची वाटचाल यांबद्दल लेखन केले आहे.मार्केट यार्डचे स्थलांतर हे सांगताना केवळ मंडईची माहिती मिळते असे नाही, तर पुण्यातील बाजारपेठ, तेथे घडणाऱ्या घडामोडी आणि ही बाजारपेठ कशी विकसित झाली, पुणे महानगर बनले म्हणजे येथील व्यापार कसा बदलला गेला त्याची कल्पना या लेखातून येते. तसाच दुसरा लेख जोशी-अभ्यंकर हत्याकांडाची माहिती देणारा. यातील इन्स्पेक्टर कदम आणि वकिलांनी घेतलेली त्यांची उलटतपासणी फारच बहारदार आहे..हुशार आणि चिकित्सक बातमीदार, एखाद्या घटनेतील बारकावे कसे टिपतो आणि संदर्भासह माहिती इतिहासाच्या कालपटलावर ही घटना किती महत्त्वाची आहे, ते विलक्षण पद्धतीने कसे स्पष्ट करतो यासाठी हे प्रकरण आवर्जून वाचावे असे आहे. असेच दुसरे प्रकरण म्हणजे टेल्को कुटुंब आणि पुण्यातील पारशी समाजाची वाटचाल सांगणारे ‘पुणेरी बावाजी’ हे प्रकरण होय.भाग एक मधील ‘अवतीभवती’ या विभागात सहा प्रकरणे आहेत; पण ही केवळ त्या घटना सांगत नाहीत, तर पुणे बदलले कसे आणि पुण्याच्या समाजजीवनात या बातम्या कशा महत्त्वाच्या होत्या हे या विभागातून चटकन लक्षात येते. पुण्याचा अभ्यास ज्यांना करायचा आहे त्यांना हा भाग वाचल्याशिवाय पुढे जाताच येणार नाही..दुसऱ्या भागात देश-विदेशातील घटना आहेत. यामध्ये राजीव गांधी आणि अटलबिहारी वाजपेयी यांची व्यक्तिचित्रे आहेत. याआधी साबडे यांचे ‘व्यक्तिरंग’ हे व्यक्तिचित्रणांचे पुस्तक प्रसिद्ध झालेले आहेत. एखाद्या व्यक्तीचे नेमके वर्णन आणि त्याची बलस्थाने, तसेच त्याच्या कमकुवत बाजू यादेखील त्या माणसाचे कुठेही अवमूल्यन न होता कशा सांगायच्या यामध्ये त्यांची मास्टरी आहे. प्रभावीपणे त्या व्यक्तीचे गुणदोष ते लेखातून मांडतात..त्यांचे शब्द येथे कुंचला बनून त्या माणसाचे पोट्रेटच उभे करतात. राजीव गांधी आणि वाजपेयी यांच्यावरची ही प्रकरणे आवर्जून वाचावीत अशी झालेली आहेत. वाजपेयींच्या काळात संघाचे तत्कालीन सरसंघचालक के. सी. सुदर्शन यांनी त्यांच्यावर जहरी टीका केली होती. या टीकेनंतर वाजपेयी एका कार्यक्रमाच्या निमित्ताने पुण्यात आले होते.हाडाचा पत्रकार छोटीशी संधीसुद्धा कशी साधतो आणि वाजपेयींसारख्या बुलंद व्यक्तिमत्त्वाला नेमका प्रश्न विचारून माहिती घेण्याचा प्रयत्न कसा करतो ते या प्रकरणातून कळते, त्याचबरोबर वाजपेयींनी त्याला दिलेले उत्तर आणि बातमी कसा जन्म घेते तेही या प्रकरणातून कळते..‘नाती अल्प काळाची, चिरंतन आठवणींची’ या प्रकरणात साबडे एका शिष्यवृत्तीच्या निमित्ताने परदेशात गेल्यावर त्यांना तेथे जी मंडळी भेटली त्यांच्याशी त्यांचा स्नेह कसा जुळला, त्यांच्याबरोबर कशा चांगल्या आठवणी जोडल्या गेल्या हे त्यांनी तितक्याच ओघवत्या शैलीत पण भावभावना पुरेशा स्पष्ट होतील अशा पद्धतीने मांडल्या आहेत.मणी, सँड्रा, डेव्हीड, रफिक आणि ब्रूस अंकल या माणसांना वाचक कधी भेटण्याची शक्यता नाही; पण साबडे यांच्या सहजसोप्या शैलीतील प्रभावीपणे मांडलेल्या व्यक्तिरेखांमुळे ही माणसे प्रत्यक्ष भेटल्याचा भास वाचकाला नक्कीच होतो. ज्या काळात मोबाइल, ई-मेल आणि संगणकीय क्रांती झालेली नव्हती या काळातील हे अनुभव आहेत. त्यामुळे त्या अनुभवांचे वेगळेपण वेगळे आहे..लेखकाने ते अत्यंत चपखलपणे त्याला ललित लेखनाची जोड देऊन वाचकांसमोर उभे केले आहे. या कथा असल्या तरी त्यामध्ये केवळ कल्पनारम्यता नाही, तर लेखकाने कर्तव्यकठोरतेने काही विश्लेषणही केले आहे. पत्रकाराच्या चिकित्सक नजरेतून काही बाबी नेमकेपणाने टिपल्या आहेत आणि त्याला संदर्भाची जोड देऊन त्या वाचकांसमोर सादर केल्या आहेत.पुण्यापासून अमेरिकेतील अत्याधुनिक शहरातील वातावरण टिपणारे हे पुस्तक एकाच वेळी आजच्या लोकल ते ग्लोबल या संज्ञेची आठवण करून देते. त्याचबरोबर २००० सालापूर्वीच्या ५० वर्षांच्या इतिहासाची रंजक सफरही घडवून आणते. जोशी-अभ्यंकर घटनेसारख्या काही कटू आठवणीही त्यात आहेत, तर टेल्को कुटुंबासारख्या प्रगतीच्या खुणादेखील आहेत..पुस्तकाचे नाव : वार्तांच्या झाल्या कथालेखक : राजीव साबडेप्रकाशक : रोहन प्रकाशन, पुणे(०२०-२४४८०६८६, ७०६६७३८८८८)पृष्ठे : ३१८ मूल्य : ४९५.सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.