Black Mirror Netflix SeriesSakal
सप्तरंग
येणाऱ्या पिढीचे पिडायन
काही वर्षांपूर्वी नेटफ्लिक्सवर ‘ब्लॅक मिरर’ या चार्ल्स ब्रूकर लिखित वेबसीरिजने पुरता धुमाकूळ घातला होता. तंत्रज्ञानामुळे बदलणाऱ्या नातेसंबंधांवर आणि सामाजिक आयुष्यावर प्रति वास्तववादी विधान केलं होतं.
संकेत म्हात्रे shabd.sanket@gmail.com
काही वर्षांपूर्वी नेटफ्लिक्सवर ‘ब्लॅक मिरर’ या चार्ल्स ब्रूकर लिखित वेबसीरिजने पुरता धुमाकूळ घातला होता. तंत्रज्ञानामुळे बदलणाऱ्या नातेसंबंधांवर आणि सामाजिक आयुष्यावर प्रति वास्तववादी विधान केलं होतं. एकार्थाने डिस्टोपियन जगाचं दर्शन ‘ब्लॅक मिरर’मुळे लोकांसमोर आलं. यंत्रवतपणा आणि कृत्रिम उपकरण जेव्हा माणसाच्या मेंदूपासून डीएनएपर्यंत शिरतील तेव्हा माणसामाणसांत कोणते आंतरिक आणि सामाजिक बदल घडतील याचे धक्कादायक चित्रण या वेबसीरिजमध्ये पाहायला मिळालं होतं, पण त्या वेळी वाटणारी ही काल्पनिक अतिशयोक्ती हळूहळू खरी वाटू लागली, कारण या डिस्टोपियन जगण्याची चाहूल मला आपल्या आजूबाजूला दिसू लागली. अजूनही दिसते.

