
अरविंद रेणापूरकर-arvind.renapurkar@esakal.com
जगात श्रीमंतांची कमी नाही. अब्जाधीश आणि कोट्यधीश मंडळी आपली जीवनशैली खास आणि वेगळी ठेवण्यासाठी आलिशान गोष्टींमध्ये गुंतवणूक करतात. उदा. फार्महाउस, आलिशान वाहने, जमीन, चार्टर प्लेन आदी. यातही मोटार हा त्यांच्या यादीतील सर्वांत वरचा पर्याय असतो. लिमोझिन श्रेणीतील वाहनांना तर विशेष स्थान असते. प्रशस्त, ऐसपैस आणि समोरासमोर बसण्याची सुविधा असणाऱ्या ‘लिमोझिन’ची चर्चा काही वेळा बड्या उद्योगपतींच्या ताफ्यात असण्यावरूनही होते. रोल्स रॉयस, बेंटली, मर्सिडिझ यासारख्या कंपन्यांनी लिमोझिनचा ब्रँड विकसित केला. एकार्थाने ही वाहने शाही बग्गीची आठवण करून देणारी आहे.