- किशोर बळी, kishorbali11@gmail.com
विदर्भात गोंडी, आंध, बंजारा, कोलामी, पोवारी अशा अनेक बोली वेगवेगळ्या जिल्ह्यात बोलल्या जातात. प्रत्येक बोलीचे स्वतंत्र महत्त्व आहेच, परंतु वऱ्हाडी बोलीचा प्रवाह खळाळता ठेवण्यासाठी त्या सर्व साहाय्यभूत ठरल्या आहेत. यवतमाळ जिल्ह्यातील या बोलीवैविध्याचा प्रा. अशोक राणा यांनी उत्तमप्रकारे लेखाजोखा मांडला आहे. नागपुरी बोलीवरदेखील असे संशोधन झाले आहे.