
अशोक कोतवाल - saptrang@esakal.com
बारा कोसांवर भाषा बदलते असं म्हटलं जातं, हे अहिराणीच्या बाबतीत तंतोतंत खरं आहे. तालुकागणिक अहिराणीचे उच्चार आणि हेल यांमध्ये विविधता आहे. एकेका शब्दाचे वेगवेगळे उच्चार केले जातात. उदा. ‘केव्हा’ या शब्दासाठी- कधय- कव्हय- कव्हे- कहिन अथवा ‘का’ या शब्दासाठी काभरं- काबरं- काम्हून- काबं... ‘इथे-तिथे’ हे शब्द अहिराणीत पूर्व भागात ‘आठे-तठे’, ‘आथा-तथा’, पश्चिम भागात ‘इबाक-तिबाक’ किंवा अहिराणीच्या पोटभाषा लेवापाटीदारी बोलीत ‘आढी-तढी’, तर गुजराऊ बोलीत ‘यहान-त्याहान’ असे एकाच अर्थाने पण वेगवेगळ्या प्रकारे बोलले जातात.