
शैलेश नागवेकर - shailesh.nagvekar@esakal.com
कोणत्याही स्पर्धेत धक्कादायक निकाल लागतात; पण काही निकाल भुवया उंचावणारे असतात. एकवेळ सामान्य प्रेक्षकाला सामन्यात जाणीवपूर्वक खराब खेळ केला जात आहे, हे समजणार नाही; परंतु माजी खेळाडू, पंच, व्यवस्थापक, संयोजक आणि संघटनेचे पदाधिकारी या सर्वांना काही मिनिटांतच अशा प्रकाराचा गंध येतो. तुम्ही जाणीवपूर्वक केलेला प्रकार असो वा आखलेले डावपेच, शेवटी खेळाची प्रतारणा केली जात असते. ती मायबाप प्रेक्षकांची केलेली धूळफेक असते.