‘स्वतःची स्टाइल तयार करा’; प्राजक्ता माळी

सध्या जे ट्रेंडमध्ये आहे, ते फॉलो करायलाच पाहिजे असे नाही ‘हम करे सो स्टाइल’ हे तत्त्वही उत्तम
fashion tips Create your own style Prajakta mali
fashion tips Create your own style Prajakta mali sakal
Summary

काळा रंग खूप उष्णता शोषतो. फ्रेश आणि लाइट कलर्स मला खूप आवडतात. प्रत्येकाने स्वतःच्या स्किनटोनचा, उंचीचा आणि शरीरयष्टीचा अभ्यास करून आपल्याला काय सूट होते, त्यानुसार कपडे परिधान करावेत.

मी मध्यम उंचीची मुलगी असल्याने आडव्या लाइन्स किंवा आडव्या प्रिंट असलेले कपडे घालत नाही. कारण, त्यामुळे मी ब्रॉड दिसते. त्यामुळे मी कॉलरबोन ओपन ठेवते. गळा असलेले ड्रेसच घालते. गळा बंद असलेले ड्रेस घालत नाही. त्यामुळे माझी उंची कमी वाटते किंवा मानेची हाइट कमी वाटते. परिणामी, गाल जास्त वाटतात. त्यामुळे मी कॉलर असलेले कपडे अजिबात घालत नाही, तसेच स्लीव्हलेस कपडेही घालत नाही. बॅगी ड्रेसेसही मी अजिबात घालत नाही. त्यामुळे उगाचच तुम्ही आडवे व उंचीने लहान दिसता.

काळा रंग खूप उष्णता शोषतो. फ्रेश आणि लाइट कलर्स मला खूप आवडतात. प्रत्येकाने स्वतःच्या स्किनटोनचा, उंचीचा आणि शरीरयष्टीचा अभ्यास करून आपल्याला काय सूट होते, त्यानुसार कपडे परिधान करावेत. मला कम्फर्टेबल वाटतील, अशाच प्रकारचे कपडे परिधान करण्यास मी प्राधान्य देते. लूझ, सुती कपडे मला आवडतात. कपडे घातल्यानंतर आपल्याला मोकळेढोकळे वाटले पाहिजे. मला सलवार कुर्ता फार आवडतो; पण दुप्पटा नाही. आपल्याला काय आवडते अन् मला काय चांगले दिसते, या गोष्टी पाहून प्रत्येकाने हाच फॅशनफंडा अवलंबला पाहिजे. आपल्या स्किनटोनला काय मॅच होते अन् काय चांगले दिसते, हे ओळखूनच कपडे परिधान करावेत. सावळ्या रंगाच्या लोकांनी फार पांढरेशुभ्र कपडे घालू नयेत. यलो किंवा थोडेसे ऑफ कलर्सकडे गेले पाहिजे. गोऱ्या लोकांना गडद रंगाचे- उदाहरणार्थ जांभळे किंवा व्हायब्रंट रंगांचे कपडे खूप छान दिसतात.

माझे फॅशन आयकॉन खूप असले, तरी प्रत्येकीचेच काही ना काही चुकत असते. मात्र, आलिया भट्ट हिचा फॅशन सेन्स खूप चांगला आहे. श्रद्धा कपूरचाही फॅशन सेन्स चांगला आहे. सोनम कपूर कधीकधी खूप एलिगंट कपडे वापरते. नॉर्मल कॅज्युएल वेअर मला अनुष्का शर्मा हिचे आवडते. आता मी ‘रोड शॉपिंग’ बंद केली असून, ब्रँडेड शॉपिंग मी करते. रस्त्यावरील कपडे घेण्याऐवजी एक ब्रॅंडेड ड्रेस जास्त काळ टिकतो आणि एलिगंट दिसतो. अर्थात सगळ्यांच्या खिशाला ते परवडणारे आहे, असे नाही; पण पाच गोष्टी घेण्यापेक्षा एकच गोष्ट घ्या; पण ती चांगली घ्या, असे माझे म्हणणे असते.

फॅशन टीप्स

  • सध्या जे ट्रेंडमध्ये आहे, ते फॉलो करायलाच पाहिजे असे नाही. करत नाही. ‘हम करे सो स्टाइल’ हे तत्त्वही उत्तम.

  • आपल्याला काय शोभून दिसते, याचा अभ्यास करून फॅशन करावी. आपला शरीरप्रकार, त्वचेचा रंग यानुसार स्टायलिंग केली पाहिजे.

  • सगळ्याच पद्धतीचे कपडे आपल्याकडे असायला हवेत, कारण मी जीन्स परिधान करत नसले, तरी काही मीटिंग्जसाठी जीन्सच चांगली वाटते. साड्या, जीन्स, सलवार कुर्ता, शॉर्ट, मिनी स्कर्ट, मिनी पार्टीवेअरही पाहिजे. सगळ्याच स्टाइल आपण कॅरी केल्या पाहिजेत.

  • कपड्यांबरोबर इतर वस्तूंचाही फॅशन करताना विचार करावा.

  • अंगावर कमी ज्वेलरी घातली पाहिजे; पण ती एलिगंट असली पाहिजे.

- प्राजक्ता माळी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com