
आताच्या आधुनिक युगात असा एकही प्रामुख्याने वेगवान गोलंदाज सापडणार नाही, ज्याला दुखापतीमुळे ब्रेक घेणे अनिवार्य झाले आहे. भारतीय क्रिकेटचाच नव्हे तर क्रिकेटविश्वातील सध्याचा सर्वोत्तम वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमरा ऑस्ट्रेलियात चार कसोटी सामन्यांची मालिका खेळला आणि आता तो पाठीच्या दुखापतीमुळे क्रिकेटपासून दूर झाला आहे.