- जयेंद्र लोंढे, jayendra.londhe@esakal.com
रुद्रांक्ष पाटील हा मूळचा ठाणेकर. आई-वडील क्लासवन अधिकारी असल्यामुळे रुद्रांक्षचा नेमबाजीतील प्रवास सोपा असेल, असे वाटले असावे; पण प्रत्यक्षात तसे झाले नाही. २०१५ मध्ये छंद म्हणून या खेळाकडे वळलेल्या रुद्रांक्ष याने २०१७मध्ये नेमबाजीकडे करिअर म्हणून बघितले. नेमबाजी हा खेळ महागडा आहे. त्यामुळे या खेळाला लागणारी साहित्य परवडणारी नाहीत.