- हरीश बुटले, harishbutle@gmail.com
अमेरिकेत शिकणाऱ्या एकूण परदेशी विद्यार्थ्यांत भारतीय तरुणांची संख्या सर्वाधिक असल्याचे समोर आले आहे. अमेरिकेत सर्वाधिक विद्यार्थी पाठवणारा देश म्हणून भारताचे नाव अग्रस्थानी आहे. कॅनडा, ब्रिटन, ऑस्ट्रेलिया, जर्मनी इत्यादी देशांतही भारतीय विद्यार्थ्यांची संख्या लक्षणीय आहे.
आपल्या देशात उच्च शिक्षणाच्या सुविधा वाढत असतानाही भारतीय विद्यार्थी परदेशी का जात आहेत, याचा विचार करण्याची गरज आहे. नवीन शैक्षणिक धोरणानुसार अभ्यासक्रमांमधील लवचिकता आणि क्रेडिट ट्रान्स्फरसारख्या बाबी आता भारतातही सुरू झाल्याने विद्यार्थ्यांनी इथेच उच्च शिक्षण घेणे फायद्याचे ठरणार आहे.