Motivational Story : ससा आणि कासवाची गोष्ट

rabbit and tortoise story : ‘फॉरेस्ट केव्ह्ज’च्या कार्यशाळेत ससा–कासव स्पर्धा होते. ससा आयुष्यातील आनंद अनुभवत थांबतो, तर कासव शिस्तीत पुढे जातो. शेवटी ससा जाणीवपूर्वक उशिरा पोहोचतो; मैत्री, संवेदनशीलता आणि कामापलीकडील आयुष्याची जाणीव दोघांनाही होते.
rabbit and tortoise story

rabbit and tortoise story

sakal

Updated on

सारिका चाटुफळे-कुलकर्णी- sarikachatuphale.kulkarni@gmail.com

‘फॉरेस्ट केव्ह्ज’च्या ऑफिसात पुष्कळ कर्मचारी काम करत होते. त्यात बिबट्या, वाघ, सिंह, हत्ती, हरीण, ससे, उंट असे कित्येक प्राणी तर होतेच शिवाय कासव, मगर असे प्राणीदेखील होते. कुरियर सर्व्हिस विभागात हल्ली पक्षीदेखील नेमायला सुरुवात झालेली होती. हल्लीच्या कामाच्या ठिकाणी जसा सर्वसमावेशकता या विषयावर भर दिला जातो तसा ‘फॉरेस्ट केव्ह्ज’मध्येदेखील दिला जात असे. गुणवत्ता हा एकच निकष फॉरेस्ट केव्ह्जमध्ये काम करण्यासाठी पुरेसा होता. गुणवत्ता वाढावी म्हणून कर्मचाऱ्यांसाठी कितीतरी प्रशिक्षण कार्यशाळा भरवल्या जात.

एकदा अशीच एक कार्यशाळा महाबळेश्वर येथे भरवण्यात आली. मगर, मासे यांना खरे तर गोव्याला ती कार्यशाळा व्हावी, असे वाटत होते; पण ह्युमन रिसोर्सेस विभागात घोडा आणि गाढव काम करत होते. त्यांना डोंगरावर जाणे आवडत असे. त्यांच्या आवडीचे ठिकाणच निवडले गेले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com