Marathi New Books Review : नव्या मराठी पुस्तकांचा मेळा; संगीत, नाती, बौद्ध तत्त्वज्ञान आणि अमेरिकेच्या प्रवासकथांचा बहुरंगी आस्वाद

Jaipur Gharana Music and Classical Bandish Essays : शास्त्रीय संगीत, मानवी नात्यांची गुंतागुंत, लोकशाहीवादी बौद्ध तत्त्वज्ञान आणि अमेरिकेची बहुआयामी जीवनशैली या वेगवेगळ्या विषयांवर भाष्य करणाऱ्या चार नव्या दर्जेदार मराठी पुस्तकांचा आणि त्यांच्या वैशिष्ट्यांचा घेतलेला रंजक आढावा.
Jaipur Gharana Music and Classical Bandish Essays

Jaipur Gharana Music and Classical Bandish Essays

esakal

Updated on

संगीताच्या संगती

संगीत, संगीत विचार, संगीत समीक्षा आणि सांगीतिक व्यक्तिमत्त्व यांची उपयुक्त माहिती देणारा डॉ. विवेक गोखले यांचा संगीताच्या संगती हा लेखसंग्रह वाचकांच्या भेटीस आला आहे. गोखले यांनी स्वतः अभिजात भारतीय शास्त्रीय संगीताचे सखोल शिक्षण घेतले असून, प्रदीर्घ संगीत साधनाही केली आहे. अनेक दिग्गज कलावंतांचा त्यांना सहवास लाभला आहे. अभिजात संगीत आणि घरंदाज गायकी, बंदिश, कलांतील साधर्म्य व वैधर्म्य, जयपूर घराण्याची गायकी, कुमारांचे सांगितिक प्रोफाइल यांसह भैय्यासाहेब देशपांडे, तबलानवाज मदनसिंग असे व्यक्तिचित्रणपर लेखही या पुस्तकात आहेत. सुमारे १७ लेखांचा समावेश संग्रहात करण्यात आला आहे.

  • प्रकाशक : सुनिधी पब्लिशर्स, पुणे

  • पृष्ठे : १२२,

  • मूल्य : २५० रु.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com