Animal Story : कोल्ही–करकोचा प्रेमकथा: जातीपाती, अहंकार आणि अपमानाच्या पलीकडचा धडा

Fox and Stork : राजकीय पार्श्वभूमी असलेल्या कोल्ह्याच्या कुटुंबात शिकणाऱ्या कोल्हीची एका नव्या प्राध्यापक करकोचाशी झालेली अनोखी भेट पुढे आयुष्याला वेगळे वळण देणाऱ्या कथानकाची सुरुवात ठरते.
Beginning of a New Story

Beginning of a New Story

esakal

Updated on

सारिका चाटुफळे-कुलकर्णी - sarikachatuphale.kulkarni@gmail.com

एका जंगलात एका कोल्ह्याचे कुटुंब राहत असे. मि.कोल्हा, मिसेस कोल्ही, मास्टर कोल्हा आणि मिस कोल्ही असे त्यांचे चौकोनी कुटुंब होते. कोल्ह्याचे कुटुंब राजकारणात होते. म्हणजे दोन पिढ्यांपासून कुटुंबाला राजकारणाची परंपरा होती.

मास्टर कोल्हा देखील आता राजकारणात स्थिरावू पाहत होता. युवा नेतृत्व म्हणून श्रीयुत कोल्हा त्यांना पुढे आणत होते. मिस कोल्ही कॉलेजच्या शेवटच्या वर्षात शिकत होती. ती कॉलेजच्या सांस्कृतिक विभागात सक्रिय होती. तिचेही नेतृत्व सगळीकडे मान्य होऊ लागलेले होते. पुढे जाऊन भावाच्या ऐवजी तीच राजकारणात चांगली जागा मिळवेल असा सगळ्यांचा कयास होता.

एके दिवशी कॉलेजचा वर्ग भरलेला होता. प्रोफेसर येणार तितक्यात बाहेरून फेंगड्या पायाने चालत येणारा एक प्राणी दिसला. कॉलेजमध्ये आतापर्यंत सगळे चतुष्पाद प्राणीच होते. पक्षासारखा दिसणारा हा आहे तरी कोण म्हणून सगळे उत्सुकतेने बघू लागले. त्या फेंगड्या प्राण्याला वर्गाचा दरवाजा उघडता येईना. कितीतरी वेळ तो दरवाजाशी झटत होता. त्याची अडचण मिस कोल्हीने ओळखली आणि पटकन पुढे जाऊन दरवाजा उघडला. पण बेसावध असलेला तो प्राणी तोल जाऊन मिस कोल्हीच्या अंगावर पडला. फेंगडे पाय, लांबच लांब चोच, अर्धा काळा अर्धा पांढरा असा रंग. विचित्र असा पक्षीच होता तो. त्याचे हे रूप आणि ही गडबड बघून सगळेच त्याला जोरजोरात हसायला लागले. मिस कोल्हीने सगळ्यांना शांत केले आणि त्या पक्षाला आपली ओळख विचारली. तो म्हणाला, " मी करकोचा. तुमच्या वर्गावर आजपासून प्रोफेसर म्हणून आलो आहे."

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com