
- विवेक पंडित, pvivek2308@gmail.com
मालकधार्जिण्या भूमिकेविरोधात मोर्चा काढण्याचं आम्ही ठरवलं. आम्ही आठ गड्यांची मुक्तता करण्यासाठी ‘मित्र निधी’ उभा करीत होतो. आम्हाला समजलं, की आणीबाणीच्या काळात इंदिरा गांधींनी एक कायदा केलेला आहे आणि त्याप्रमाणे सर्व वेठबिगार मुक्त झालेले आहेत. वेठबिगारांची मानसिक गुलामी पूर्ण नष्ट व्हावी आणि त्यांच्या अंतःकरणातले स्वातंत्र्याचे स्फुल्लिंग पेटते ठेवण्यासाठी आम्ही एक युक्ती योजली आणि ती कामी आली. त्यांच्या मनातल्या गुलामीच्या शृंखलांचं जोखड पार हलकं झालं होतं. ‘तू जा. कर... काय होतं ते बघू’ अशा शब्दांनीच ते खऱ्या अर्थाने मुक्त झाले होते आणि आत्मविश्वासाने गावात वावरायला लागले...