
एन. के. खांबेटे
बांधकाम व्यावसायिक हा शब्द उच्चारला, तरी आपल्या डोळ्यांसमोर वेगवेगळ्या प्रतिमा उभ्या राहतात, त्यात मुंबईत तर बांधकाम व्यवसायात स्पर्धा अफाट. अशा परिस्थितीत सांगली जिल्ह्यातील एका छोट्या खेड्यातून आलेल्या एका तरुणानं बांधकाम व्यवसायात प्रवेश करून तिथं यश मिळवणं हे फार मोठी गोष्ट आहे. मोहन देशमुख यांनी मुंबईत येऊन बांधकाम व्यवसायात प्रवेश केला.