पैठणी किंवा सतार या सारख्या उत्पादनांमुळे एखाद्या गावाची ओळख निर्माण होते. मात्र, बेकरी पदार्थांमुळे एखादे गाव लक्षात राहणे आणि प्रवासात या गावांमध्ये थांबणे असे क्वचितच घडते. मात्र, अहिल्यानगर जिल्ह्यातील सुपे या गावाबाबत असे घडले आहे. बेकरी उत्पादनांमुळे या गावाची प्रगती तर झालीच, पण खऱ्या अर्थाने इथल्या गावकऱ्यांच्या जीवनात आर्थिक क्रांती झाली.