
जयेंद्र लोंढे - jayendra.londhe@esakal.com
भारताने गेल्या काही वर्षांमध्ये बॅडमिंटन या खेळामध्ये दमदार स्मॅश मारला आहे. आजवर अनेकांनी बॅडमिंटनचा शटलकॉक उत्तमरीत्या उडवत भारतासाठी चमकदार कामगिरी केली आहे. भारतीय खेळाडूंनी ऑलिंपिक, जागतिक, थॉमस व उबेर, आशियाई अजिंक्यपद, आशियाई सांघिक अजिंक्यपद, आशियाई मिश्र सांघिक अजिंक्यपद, आशियाई स्पर्धा यांसारख्या आव्हानात्मक मालिकांमध्ये पदकांवर मोहर उमटवली; मात्र मागील काही महिन्यांमध्ये भारतीय खेळाडूंना बॅडमिंटन कोर्टवर यश मिळवता आलेले नाही. वरिष्ठ खेळाडूंचे वाढते वय, खेळाडूंच्या दुखापती व युवा अव्वल दर्जाच्या खेळाडूंचा अभाव याप्रसंगी प्रकर्षाने समोर आला आहे.