Futane Bai Sweet Shop
esakal
Futane Bai Sweet Shop : गिरगावातील फुटाणेबाईंच्या गोड परंपरेला सव्वाशे वर्षांचा वारसा
प्रशांत ननावरे - nanawareprashant@gmail.com
फुटाणे न आवडणारी असंख्य माणसं सापडतील, पण ते हातावर ठेवले जात असताना नाही म्हणण्याची कुणाचीच हिंमत होत नाही. मूठभर घेतले नाही तरी नाइलाजाने एखादा दाणा तरी तोंडात टाकावाच लागतो. म्हणूनच हे फुटाणे म्हणजे ‘मूर्ती लहान, किर्ती महान’ असं प्रकरण आहे. फुटाणेबाईंच्या मिठाईच्या दुकानाचेही तसेच आहे.
सणासुदीला, धार्मिक कार्याला काही विशिष्ट पदार्थ किंवा प्रसाद देण्याची/वाटण्याची परंपरा आहे. या परंपरेतील सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे फुटाणे. ‘तुम्ही माझ्यावर प्रेम करा अथवा नका करू, परंतु माझ्याकडे दुर्लक्ष करू शकत नाही’, अशी एक म्हण इंग्रजी भाषेत आहे. ही म्हण या फुटाण्यांना तंतोतंत लागू पडते. इतर कोणत्याही पदार्थांसोबत सहज खपून जाईल असा हा पदार्थ, परंतु हाच मुख्य पदार्थ म्हणून विक्री करणारे कुटुंब/दुकानाला भेट दिल्यानंतर सहसा लोकांना माहीत नसलेल्या असंख्य गोष्टींचा उलगडा होतो. अचंबित करणाऱ्या या गोष्टींची सुरुवात त्याच्या नावापासूनच होते आणि कहाण्या संपता सपत नाहीत.

