अशी बोलते माझी कविता (गणेश गायकवाड)

गणेश गायकवाड, ८६०५५४००६३, ganugaikwad७८६३@gmail.com
रविवार, 26 मार्च 2017

...त्याला काय सांगू?

गावाकडं शेतात खपणारा बाप
रोज डबा पाठवून देतो
पोरगं शिकतंय म्हणून
चार दिसाला फोन करून
विचारपूस करतो
अभ्यासाची आणि तब्येतीचीही...

मी वाचतोय पुस्तकांवर पुस्तकं
इतिहासापासून जागतिकीकरणापर्यंतची
जातीयवादापासून प्रांतवादापर्यंतची
मी रोज बघतोय
जातींसाठी निघणारे मोर्चे
बलात्कारांच्या आकडेवारीत होणारी वाढ
आणि शिक्षणव्यवस्थेची ढासळलेली अवस्था

...त्याला काय सांगू?

गावाकडं शेतात खपणारा बाप
रोज डबा पाठवून देतो
पोरगं शिकतंय म्हणून
चार दिसाला फोन करून
विचारपूस करतो
अभ्यासाची आणि तब्येतीचीही...

मी वाचतोय पुस्तकांवर पुस्तकं
इतिहासापासून जागतिकीकरणापर्यंतची
जातीयवादापासून प्रांतवादापर्यंतची
मी रोज बघतोय
जातींसाठी निघणारे मोर्चे
बलात्कारांच्या आकडेवारीत होणारी वाढ
आणि शिक्षणव्यवस्थेची ढासळलेली अवस्था

डिग्र्या घेऊन बसलेली पोरं
मला रोजंच भेटतायत हल्ली
चौकाचौकांत, चहाच्या टपरीवर
सीएचबीवर घासून घेतायत ती
शिक्षणानं दिलेलं द्रारिद्र्य...

या दोन अवस्था बेचैन करतात मला
एक बापाची आणि दुसरी या व्यवस्थेची
व्यवस्थेशी तर मी भांडूच नाही शकत
कारण, आता ती समाजमान्य झालीय!
पण मग बाप?
त्याचं काय करू?
त्याला काय सांगू?

Web Title: ganesh gaikwad write poem in saptarang