- डॉ. उज्ज्वला दळवी, editor@esakal.com
‘गणित हा परीक्षेपुरता, कंटाळवाणा, रूक्ष विषय आहे,’ अशी कल्पना लोकांच्या मनात घट्ट बसलेली असते. गणित सोपे आहे हे मुलांपर्यंत पोचवायला गणित रोजच्या जगण्याला भिडलं पाहिजे. गणिताच्या पाठ्यपुस्तकातील उदाहरणांना रोजच्या जगण्यातील घटनांचा साज चढवलेला असतो खरा पण तिथेही ठरलेलं तंत्र, शिकवलेलं सूत्र, तेच ते त्रैराशिक वापरायचं असतं. डोकं न चालवता फक्त कंटाळवाणी आकडेमोड करावी लागते. प्रत्येक गणितातून डोक्याला नवी तरतरी आली तरच त्या विषयाची चटक लागेल.