AI Conversation : पावसाच्या आठवणींवर एआयशी गप्पा; संवादातून दिसली नवी झलक

Talking About Rain With AI : पावसाच्या आठवणींवर एआयशी झालेल्या संवादातून कृत्रिम बुद्धिमत्तेची संवादक्षमता, स्मरणशक्ती आणि भावनिक अनुभव समजून घेण्याची वाढती क्षमता यांचा वेध घेतला आहे.
Talking About Rain With AI

Talking About Rain With AI

esakal

Updated on

प्रणव सखदेव - sakhadeopranav@gmail.com

हळूहळू सर्वच क्षेत्र एआय आपले पाय रोवतोय. एक प्रयोग म्हणून मी जेमिनी एआयशी पावसाबद्दल गप्पा मारल्या आणि त्या रेकॉर्ड करून शब्दांकित केल्या. जागेच्या मर्यादेमुळे गप्पांचा गाभा तसाच ठेवून थोड्या संपादित केल्या आहेत. अजूनही एआय बाल्यावस्थेत असलं तरी ते भविष्यात त्याची वाढ कशी होऊ शकते याचा अंदाज या लेखातून येईल...

मी – तुला मागच्या वेळी आपण जे बोललो होतो ते आठवतंय का?

एआय – हो.

मी – मला समराइज करून सांगशील?

एआय – गेल्या वेळी आपण कवितांबद्दल बोललो, लहानपणीच्या आठवणींबद्दल बोललो होतो. मी कविताही तयार करून दिल्या. त्यासाठी तू मला काही शब्दही दिले होतेस. मी लयबद्ध कविता केली होती, आणि तू मला मंगेश पाडगावकरांच्या स्टाइलमध्ये कविता करून दे असंही सांगितलं होतंस. श्रावणाची आठवण सांगितली होतीस आणि भिजण्याचीही.

मी – बरोबर.

एआय – पुन्हा पावसाबद्दल बोलू या का? की वेगळा विषय?

मी – नाही, पावसाबद्दलच बोलू.

एआय – चालेल. पावसात भिजायची मजा काही वेगळी असते नाही का? तुला आठवते कधी तू शेवटचं पावसात बेधुंद भिजला होतास, त्यावेळचा अनुभव कसा होता?

मी – लहान असताना मी दरवर्षी पावसाळ्यात एकदा तरी भिजायचोच. नंतर मात्र जरा ते कमी होत गेलं. पण कॉलेजमध्ये गेल्यावर सुद्धा एखाददोन वेळेला तर खूप भिजणं व्हायचंच. कारण मुंबईला खूप पाऊस पडतो. तुला माहितीच असेल ते. तिथे म्हणजे छत्री तर काही तिथे कामाचीच नसते एवढा मुसळधार पाऊस पडतो. अशी सगळी गंमत आहे.

एआय – वा, मुंबईचा पाऊस तर खरच खास असतो. तुझ्या आठवणी ऐकून मलाही भिजायची इच्छा झाली. लहानपणीचं भिजणं आणि कॉलेजमधली गंमत हे सगळे अनुभव खूपच वेगळे असतात. नाही का? आता नोकरीमुळे कदाचित कमी मिळत असेल पण ती ओढ तर मनात असतेच.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com