Premium|Geopolitics and Geoeconomics : अर्थकारणातले आकडे ठरली हत्यारे ...

Geopolitics and Geoeconomics : भू-राजकारणात नकाशा आणि भौगोलिक स्थानाचे महत्त्व कायम असताना व्यापार, चलन, साधनसंपत्ती आणि आर्थिक दबावाच्या माध्यमातून राष्ट्रीय हित साधणारे भू-अर्थकारण अधिक प्रभावी ठरत आहे.
Geopolitics and Geoeconomics

Geopolitics and Geoeconomics

esakal

Updated on: 

श्रीराम कुंटे - kunteshreeram@gmail.com

युरोपीय साम्राज्यं आपल्या वसाहतींचा विस्तार करायला लागल्यापासून शत्रूबद्दल चर्चा करताना येणारा पहिला प्रश्न असायचा तो म्हणजे नकाशावर शत्रू कुठे आहे? कोण कोणावर हल्ला करू शकेल, कोणाला नौदलाची गरज आहे, कोण सतत आक्रमणाच्या छायेत राहील या सर्व गोष्टी पर्वत, सामुद्रधुनी, मैदानी प्रदेश किंवा समुद्र किनारे ठरवायचे. मॅकिंडरचा हार्टलंड सिद्धांत, महानचा सागरी शक्तीचा सिद्धांत किंवा स्पिकमनचा रिमलँड सिद्धांत या प्रत्येक भू-राजकीय मांडणीमागे नकाशाचं स्थान महत्त्वाचं होतं. अगदी आपणही आपल्या लेखमालेत आजपर्यंत भारताचे जगाबरोबर चाललेले ग्रेट गेम्स बघितले त्यांच्यामागे मलाक्का, दक्षिण चीन समुद्र, मध्य आशियाचं भौगोलिक स्थान, हिंदी महासागर यांसारख्या भौगोलिक घटकांचा मोठा प्रभाव होता. आज भूगोलाचं महत्त्व संपलं नसलं तरीही त्याच्याबरोबर जिओ इकॉनॉमिक्स किंवा भू-अर्थकारण महत्त्वाचं होऊ लागलंय. लष्कर आणि राजनीती जे साध्य करू शकतात ते सर्व व्यापार, चलन, साधनसंपत्ती यांच्यासारख्या आर्थिक साधनांचा वापर करून साध्य करणं म्हणजे भू-अर्थकारण.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com